शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरीच्या जलवाहिनी गळतीमुळे नांदेड शहरात दोन दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:35 IST

शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे़ गेल्या अनेक महिन्यांपासून या जलवाहिनीतून पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे़ एकीकडे अपु-या पाणी साठ्यामुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे सल्ले देणाºया प्रशासनाचे मात्र या गळतीकडे दुर्लक्ष होत आहे़

ठळक मुद्दे जलवाहिनीतून मात्र दररोज लाखो लिटरची नासाडी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे़ गेल्या अनेक महिन्यांपासून या जलवाहिनीतून पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे़ एकीकडे अपु-या पाणी साठ्यामुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे सल्ले देणाºया प्रशासनाचे मात्र या गळतीकडे दुर्लक्ष होत आहे़विष्णूपुरी प्रकल्पात केवळ आठ टक्के जलसाठा असल्यामुळे नांदेडकरांवर पाणीटंचाईचे संकट आले होते़ त्यामुळे महापालिकेने शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता़ परंतु उपलब्ध साठा अपुरा असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच दिग्रस बंधाºयातून २० दलघमी पाणी नांदेडसाठी सोडले होते़ त्यातील १९ दलघमी पाणी विष्णूपुरीत पोहोचले़ त्यामुळे नांदेडकरांचा उन्हाळ्याच्या पाणीप्रश्न मिटल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला़ परंतु उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे़ त्यासाठी पाण्याची होणारी गळती रोखण्याचे मोठे आव्हान मनपासमोर आहे़ परंतु नेमके त्याकडेच दुर्लक्ष केले आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येणाºया जलवाहिनीला गेल्या अनेक दिवसांपासून ठिकठिकाणी गळती लागली आहे़ प्रकल्पापासून जवळपासे पावणेचार किमीपर्यंत ही जलवाहिनी टाकण्यात आली आहे़ अनेकांनी जलवाहिनीला छिद्रे पाडून पाण्याची चोरीही सुरु केली आहे़ दिवसरात्र या जलवाहिनीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ अशाचप्रकारे पाण्याची नासाडी होत राहिल्यास उपलब्ध पाणीसाठा लवकरच संपणार अशी चिन्हे आहेत़ याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़ दुसरीकडे जिल्ह्यातील चार तालुक्यांच्या भूजलपातळीत तब्बल तीन मीटरने घट झाल्याचा अहवाल आला आहे़ त्यामुळे ग्रामीण भागाला यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़जलजागृती सप्ताहातचपाण्याचा अपव्ययएकीकडे प्रशासनाकडून १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहात पाण्याचे महत्त्व सांगण्यासाठी, पाणी बचतीचे उपाय तसेच जनतेत जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. दुसरीकडे प्रत्यक्षात जलसंधारण विभागाच्या दुर्लक्षामुळेच लाखो लिटर पाणी वाया जात असताना कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत, याचे मात्र सामान्य नागरिकांना नवल वाटत आहे.

टॅग्स :Waterपाणीvishnupuri damविष्णुपुरी धरण