दुसरीकडे ओमकारच्या आई-वडिलांनी देगलूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. याच दरम्यान पहाटे ३ वाजता बिलोली तालुक्यातील बडूर येथे एम.एच.४७-वाय.७८३७ या चारचाकी वाहनातील डिझेल संपल्याने त्याने गाडी जागेवरच थांबविली. या दरम्यान बालकाचे रडणे थांबवून त्याला बेशुद्ध करण्याच्या हेतूने आरोपीने लोखंडी सळईने त्याच्या डोक्यावर प्रहार केले. बेशुद्ध झाल्याचे लक्षात येताच गावात डिझेल आणण्यासाठी आरोपी गेला. या दरम्यान शुद्धीवर आलेल्या ओमकारने मोठ्या चलाखीने वाचवा, वाचवा अशी हाक दिली. बालकाचा आवाज ऐकून बडूर येथील वयोवृद्ध रामराव गुजरवाड यांनी गाडीकडे धाव घेतली. या दरम्यान अन्य लोकांनाही त्यांनी बोलावले. परिस्थिती लक्षात येताच आरोपी वाहन, मोबाइल व अन्य साहित्य जागेवरच सोडून पसार झाला.
बालकाच्या सांगण्यावरून गुजरवाड यांनी त्याच्या आई-वडिलांशी संपर्क केला. सगरोळी येथील त्याचे नातेवाईक संजय पाटील सगरोळीकर व ग्रामस्थांनी ओमकारला बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केले. तेथे बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश तोटावार यांनी त्याच्यावर उपचार केले. घटनेची माहिती मिळताच देगलूरच्या सपोनि जनाबाई सांगळे, जमादार सुनील पत्रे, पोलीस कर्मचारी सुनील कदम, बिलोलीचे सहायक फौजदार माधव वाडेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, सपोनि जनाबाई सांगळे तपास करीत आहेत.
आरोपी बोईनवाड हा मूळचा कोळनूर ता. मुखेड येथील रहिवासी आहे. तो मुंबई येथे वास्तव्यास होता. लॉकडाऊनदरम्यान तो देगलूर येथे राहण्यास आला. अपहृत मुलाच्या शेजारीच तो वास्तव्य करून होता. मुलाचे अपहरण करून कोणालाही संशय येऊ नये म्हणून तो दिवसभर कोळनुरे कुटुंबीयांसमवेतच होता. देगलूर पोलीस ठाण्यातही तो फिर्याद देण्यास गेला होता. एखाद्या चित्रपटातील कथेला लाजवेल, असा नित्यक्रम आरोपीने रचला होता. गाडीतील डिझेल संपल्याने त्याचा संपूर्ण डाव फसला.
(ओमकार पासपोर्ट फोटो क्र. - १६ एनपीएच एपीआर ०१.जेपीजी)
गाडीचा फोटो क्र. - १६ एनपीएच एपीआर ०८.जेपीजी