शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी सावकारीच्या त्रासाने युवकाचा ह्दयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:55 IST

घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही जमिन परत न देता खाजगी सावकारांकडून वारंवार धमकी देण्यात येत असल्याच्या तणावात ह्दयविकाराचा झटका आल्याने युवकाचा मृत्यू झाला़

ठळक मुद्देदोघांवर गुन्हा दीड लाख रुपये घेतले होते व्याजाने

नांदेड : सिडको भागातील एका वडा पाव विक्रेत्याचा आर्थिक अडचणीमुळे दोघांच्या नावे शेतीची रजिस्ट्री करुन दिली होती़ घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही जमिन परत न देता खाजगी सावकारांकडून वारंवार धमकी देण्यात येत असल्याच्या तणावात ह्दयविकाराचा झटका आल्याने युवकाचा मृत्यू झाला़ ही घटना गुरुवारी रात्री घडली़ या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़सुरेश शंकरराव गिरडे (४५) असे मयताचे नाव आहे़ पूर्वी ते आॅटो चालवित होते़ लोहा तालुक्यातील कारेगांव येथे गट क्रमांक ११२ मध्ये त्यांची पाच एकर जमीन आहे़ २००४ पासून सुरेश गिरडे यांनी बीक़े़हॉलसमोर वडापावचा गाडा सुरु केला होता़ याच ठिकाणी त्यांची संजय नागरगोजे आणि माधवराव कागणे यांच्यासोबत ओळख झाली़ आर्थिक अडचणीमुळे सुरेश गिरडे यांनी या दोघांकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते़त्या बदल्यात पाच एकर जमिनीपैकी एक एकर जमिनीची रजिस्ट्री त्यांच्या नावे करुन दिली होती़ जमिन नावे करुन देताना व्याजाचे पैसे दिल्यानंतर ती जमीन परत गिरडे यांना देण्याचे ठरले होते़ त्यानंतर गिरडे यांनी व्याजाने घेतलेली सर्व रक्कम तीन पंचासमोर परत केली़ परंतु कागणे आणि नागरगोजे यांनी त्यांची एक एकर जमीन परत करण्यास टाळाटाळ सुरु केली़ याबाबत सुरेश गिरडे आणि त्यांच्या पत्नीने सावकारांकडे अनेकवेळा घेतलेली जमीन परत करण्यासाठी विनंती केली़ परंतु दरवेळी त्यांच्याकडून धमकी देण्यात येत होती़कागणे आणि नागरगोजे यांनी गिरडे यांच्या घरी जावून त्यांना धमकाविणे सुरु केले़ त्यात गिरडे यांचे काही दिवसापूर्वीच बायपास झाले होते़ त्यामुळे त्यांची प्रकृती ठिक राहत नव्हती़ त्यात सावकारांच्या त्रासामुळे ते कायम तणावात होते़ त्याच तणावात सुरेश गिरडे यांनी गुरुवारी ह्दयविकाचा धक्का बसला अन् त्यातच त्यांचा मृत्यू झाला़ याप्रकरणी सुमित्रा गिरडे यांच्या तक्रारीवरुन संजय नागरगोजे आणि माधव कागणे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़दरम्यान, शुक्रवारी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता़ विशेष म्हणजे १२ नोव्हेंबर रोजी महिलेने या संदर्भात पोलिसात तक्रारही दिली असल्याची माहिती आली आहे़

टॅग्स :NandedनांदेडHeart Attackहृदयविकाराचा झटकाFarmerशेतकरी