शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात रक्त मिळत नसल्याने रूग्णांचे नातेवाईक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:22 IST

वाढत्या उन्हामुळे रक्तदात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे़ त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्याने रक्तदान शिबिरे होत नाहीत़ परिणामी नांदेडात रक्ताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून रक्त मिळविण्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांना रक्तदात्यासह ब्लड बँकांमध्ये विनवण्या कराव्या लागत आहेत़

ठळक मुद्देकृत्रिम तुटवडा : रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वाढत्या उन्हामुळे रक्तदात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे़ त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्याने रक्तदान शिबिरे होत नाहीत़ परिणामी नांदेडात रक्ताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून रक्त मिळविण्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांना रक्तदात्यासह ब्लड बँकांमध्ये विनवण्या कराव्या लागत आहेत़मराठवाड्यात औरंगाबादनंतर नांदेडात सर्वाधिक आरोग्य सुविधा मिळत असल्याने यवतमाळ, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील रूग्णांचा लोंढा नांदेडकडे असतो़ दररोज शेकडो रूग्ण भरती होतात़ शहरात नऊ ब्लड बँका असून येथून दररोज जवळपास पाचशे रक्त पिशव्यांची मागणी असते़ परंतु, सध्या रक्तदान शिबिरे होत नसल्याने आणि उन्हामुळे रक्तदाते समोर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा पडला आहे़पाचशेवर रक्त पिशव्यांची मागणी असताना केवळ दोनशे ते तीनशे बॅग पुरविण्यात बँकांना यश येत आहे़ तर उर्वरित रूग्णांच्या नातेवाईकांना स्वत: रक्तदाता आणूनच रक्त मिळवावे लागत आहे़ शासनाने निर्धारित केलेल्या दरपत्रकानुसार प्लेन रक्त पिशवीसाठी १४५० रूपये, प्लेटलेट ४०० रूपये, प्लाजमा - ४०० रूपये तर एसडीपी - ११ हजार रूपये आकारले जातात़ परंतु, रक्त तुटवडा असल्याने श्री गुरू गोविंदसिंघजी ब्लड बँकेत रक्तदाता असल्याने प्लेन रक्त पिशवीसाठी केवळ ८५० रूपये घेतले जात आहेत़ रूग्णांच्या नातेवाईकांनी रक्तदानासाठी पुुढाकार घ्यावा यासाठी पिशवीमागे ६०० रूपये सवलत देत असल्याचे ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ़ प्रसाद बोरूळकर यांनी सांगितले़सध्या या बँकेत पॉझिटीव्ह ग्रुपच्या बोटावर मोजण्याएवढ्या पिशव्या उपलब्ध आहेत़ तर निगेटीव्ह रक्तदाते तर मिळणे दुरापास्तच झाले आहे़ अशीच स्थिती नांदेड ब्लड बँकेची असून बोटावर मोजता येतील एवढ्या रक्तपिशव्या असून त्यामुळे मोठी गैरसोय होत असल्याचे बँकेचे संचालक स्वामी यांनी सांगितले़ दरम्यान, थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना प्राधान्य देवून मोफत रक्त दिले जाते, असे डॉ़बोरूळकर यांनी सांगितले़थॅलेसेमिया रूग्णांच्या पालकांची धावपळउन्हामुळे रक्तदात्यांची संख्या घटली़ याचा सर्वाधिक परिणाम थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांवर होत आहे़ त्यांचे हिमोग्लोबिन तीन ते चारवर येवून ठेपत आहे़ वेळीच रक्त उपलब्ध न झाल्यास त्यांच्या जिवास धोका होवू शकतो़ त्यामुळे पालकांनी पुढाकार घेवून सोसायटीमार्फत रक्तदात्यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून रक्तदान करण्याची विनंती केली जात आहे़ परंतु, अपेक्षेप्रमाणे रक्तदाते पुढे येत नसल्याने थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांचे नातेवाईक हतबल होत असल्याचे पालक बसवंत नरवाडे यांनी सांगितले़दोन दिवसांत केवळ एकाचे रक्तदानदरम्यान, नांदेड जिल्ह्यात जवळपास २५० रूग्ण थॅलेसेमियाग्रस्त असून त्यांना दर पंधरा ते वीस दिवसाला रक्त द्यावे लागते़ शासनाकडून त्यांना मोफत रक्त देण्याची सुविधा उपलब्ध आहे़ परंतु, काही बँका जाणीवपूर्वक टाळाटाळ करतात़ त्यामुळे थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांच्या पालकांनी एकत्रित येवून थॅलेसेमिया सोसायटीची स्थापना केली असून त्यांच्याकडून जुन्या शासकीय रूग्णालयात ११ ते १५ मे या कालावधीत रक्तदान शिबीर आयोजिले होते़ परंतु, दोन दिवसांत केवळ एका रक्तदात्याने रक्तदान केल्याने येथील कॅम्प बंद करण्यात आला असून नेहमीप्रमाणे शासकीय रूग्णालयातच ऐच्छिक रक्तदात्यांचे रक्त घेतले जात आहे़ रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे़

टॅग्स :Nandedनांदेडhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरHealthआरोग्य