शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

ढोलकीच्या तालावर थिरकली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:44 IST

एकापेक्षा एक सरस लावण्यांनी उपस्थितांना ढोलकीच्या तारावर थिरकविले. युवा कलाकारांच्या अदाकारीने अवघे प्रेक्षागृह मंत्रमुग्ध झाले होते.

ठळक मुद्देयुवक महोत्सव लावणी नृत्यस्पर्धा : कलाकारांच्या अदाकारीवर प्रेक्षक घायाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: युवक महोत्सवाचा मंगळवारचा दिवस लावणी नृत्यस्पर्धेने गाजला. एकापेक्षा एक सरस लावण्यांनी उपस्थितांना ढोलकीच्या तारावर थिरकविले. युवा कलाकारांच्या अदाकारीने अवघे प्रेक्षागृह मंत्रमुग्ध झाले होते.युवक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातच लावणी स्पर्धेने झाली. या स्पर्धेसाठी अटलबिहारी वाजपेयी कलामंच सजला होता. विद्यार्थ्यांसह रसिक प्रेक्षकांनीही मोठी गर्दी केली होती. साधारणत: लावणी हा कलाप्रकार सायंकाळच्या वेळी सादर केला जातो. परंतु, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने नवीन पायंडा पाडत लावणी सकाळच्या सत्रात घेण्यास मागील वर्षांपासून सुरुवात केली. या बदलास प्रेक्षक, कलावंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मनमुराद आनंद लुटला. या लावणी स्पर्धेने कॅम्पसच्या परिसरात तरुणाई ढोलकीच्या ठेक्यावर थिरकताना दिसली.‘राया मला सोडून जाऊ नका’ ही लावणी नांदेडच्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गणेश काकडे याने सादर केली. तर आकांक्षा मोतेवार या विद्यार्थिनीने ‘ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मी नाचते मी डोलते’ ही लावणी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर सादर झालेली ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशी धामी काडियेला, हात नका लावू माझ्या साडीला’, ही लावणीही भाव खाऊन गेली. ही लावणी सुरु झाल्यानंतर अनेकांनी रंगमंचापुढे येत तालावर ठेका धरला. ‘दिलबरा नटले तुमच्यासाठी’, ‘उगवली शुक्राची चांदणी’, ‘या रावजी बसा भावजी कशी मी राखू तुमची...’ अशा एकापेक्षा एक लावण्यांनी स्पर्धेची उंची वाढली. ‘कुणीतरी यावे कवेत घावे धडधडतंय थरथरत लाही लाही होतंय माज्या अंगाची’ ही लावणी परभणीच्या संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने सादर केली. तर सोनखेडच्या लोकमान्य महाविद्यालयाचा विद्यार्थी कलावंतांनी ‘राया मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा इश्काचा गुलकंद’ या लावण्यांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी अनेक कलावंतांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकविला. लावणी महाराष्ट्राची जान आहे, लावणी ही महाराष्ट्राची आग आहे तसेच लावणी ही महाराष्ट्राचा साज आहे, हीच परंपरा जपत कलावंतांनी अदाकारी सादर केली आणि त्याला तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयातील श्रद्धा जोशी यांनी ‘चंदनाच्या पलंगी शेज मखमली लाल, दोन उभा रेशमी, गरम लोकरी शाल’ ‘अहो रंग महाली ऊब असून का काटा फुलतोय नवा बाई, बाई गं बाई झोंबतो गारवा’ तर जयक्रांती कला महाविद्यालय लातूरच्या इत्तरगे रुपालीने ‘जगात हो भारी होती एक सवारी हे लावणी नृत्य सादर केले. 

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडStudentविद्यार्थी