शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात तीन तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:02 IST

खरीप हंगामात सप्टेंबर २०१८ अखेर नंतर करण्यात आलेल्या मूल्यांकनानुसार जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी तालुक्यांत दुष्काळजन्य परिस्थिती असल्याची बाब पुढे आली असून या गावांमध्ये पुन्हा एकदा शासनाच्या वतीने पाहणी केली जाणार असून त्यानंतर दुष्काळ घोषित केला जाणार आहे

ठळक मुद्देदेगलूर, मुखेड, उमरी तालुक्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : खरीप हंगामात सप्टेंबर २०१८ अखेर नंतर करण्यात आलेल्या मूल्यांकनानुसार जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी तालुक्यांत दुष्काळजन्य परिस्थिती असल्याची बाब पुढे आली असून या गावांमध्ये पुन्हा एकदा शासनाच्या वतीने पाहणी केली जाणार असून त्यानंतर दुष्काळ घोषित केला जाणार आहे.जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात ४० टक्के तर मुखेड तालुक्यात ५८ टक्के पाऊस झाला आहे. उमरी तालुक्यातही ८२ टक्के पाऊस झाला असला तरी तो वेळेवर न झाल्याने पिके हातची गेली आहेत. देगलूर तालुक्यात भीषण परिस्थिती असून मुखेडमध्येही पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागली.उपग्रह पाहणीच्या अहवालानुसार राज्यातील १७२ तालुक्यांतील टंचाई सदृश्य परिस्थिती आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी हे तीन तालुके समाविष्ट आहेत. या तीन तालुक्यांमध्ये पुढील आठ दिवसांत पुन्हा एकदा पाहणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील या तीन तालुक्यांसह इतर तालुक्यांतही पाणी परिस्थिती बिकटच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नुकतीच जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी घेतली. या बैठकीत त्या त्या भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.मुखेड, देगलूर आणि यासह अन्य भागातील दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना हाती घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.जिल्ह्यातील या तीन तालुक्यांसह अन्य भागातील दुष्काळ निवारणाच्या कामांना प्रशासन लवकरच सुरूवात करणार आहे. त्याचवेळी शासन स्तरावरुन दुष्काळ कधी जाहीर होतो याकडेही लक्ष लागले आहे.परतीच्या पावसाने दिला दगासप्टेंबरमध्ये पाऊस थांबला. त्यानंतर तो येईल अशी अपेक्षा सर्वांनाच होती. जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला होतो. यावर्षीही होईल, असे वाटले होते. मात्र यंदा परतीच्या पावसाने दगाच दिला आहे. पिकांना तर फटका बसलाच आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अनेक तालुक्यात आॅक्टोबरमध्येच पुढे आला आहे. मुखेड तालुक्यात पाणी प्रश्न भीषण आहे. देगलूर तालुक्यातील पिकांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. रविवारी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनीही देगलूर दौरा केला. यावेळी त्यांनी तात्काळ दुष्काळ घोषित करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणी