शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

माळेगाव यात्रेत गाढव खातेय भाव; काठेवाडी, लसण्या जोडीची किंमत तब्बल ६० हजारांपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 13:10 IST

तालुक्यातील माळेगाव येथील यात्रा दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे.

- गोविंद कदमलोहा (जि. नांदेड) : गाढव शब्द उच्चारताच आपोआपच अज्ञानी, काही न समजणारा, शहाणा नसलेला असे कितीतरी अर्थ माणसाप्रती प्रतिध्वनीत होतात. परंतु, वास्तवातील गाढव हा प्राणी किती कष्टाळू, उपयुक्त आहे, हे आपण लक्षात घेत नाही. परंतु, या गाढवाची किंमत किती असते, हे गरजूंना कळल्यामुळे माळेगावच्या यात्रेत गाढव भाव खात आहे.

तालुक्यातील माळेगाव येथील यात्रा दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. याचप्रमाणे या यात्रेतील गाढवांचा बाजार देखील शेकडो वर्षांपासून एक वैशिष्ट्य जपून आहे. या भागातील सर्वात मोठा गाढवांचा बाजार या यात्रेत भरतो. हजारो गाढवांच्या खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल या ठिकाणी होत असते. यंदा गाढवाच्या जोडीची किंमत ६० हजारांवर गेली.

श्रीक्षेत्र माळेगावच्या खंडोबा देवाच्या यात्रेत उंदरापासून ते उंटापर्यंतचे सर्वच प्राणी व पक्ष्यांचा बाजार भरतो. कोरोनामुळे तीन वर्षे यात्रा भरली नाही. यंदा २२ तारखेपासून ही यात्रा सुरू झाली. शासकीय नियोजनानुसार ही यात्रा २६ तारखेपर्यंत असली तरी यानंतरही सुमारे चार-पाच दिवस यात्रा चालते. यंदा गाढवांचा बाजारही चांगला भरलाय. अनेक राज्यातून काठेवाडी, लसण्या, खेचर, जंगली या जातींची गाढवं विक्रीसाठी आली आहेत. यंदा काठेवाडी, लसण्या गाढवांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसते. ४० हजारांपासून ते ६० हजारांपर्यंत गाढवाची जोडी विक्रीसाठी आली आहे.

यंदा गाढव करायची खरेदी आणि पुढल्या वर्षी पैसे द्यायचेगाढवांच्या खरेदी-विक्रीची अनोखी परंपरा आजही काही प्रमाणात पाळली जाते. यंदा सौदा करून थोडीबहुत किंमत देऊन गाढव घेऊन जायचे व पुढच्या वर्षी सौदा केलेली संपूर्ण किंमत अदा करायची, ही विश्वासाची परंपरा आजही पाळली जात आहे. अनेक राज्यांतून काठेवाडी, लसण्या, खेचर, जंगली या जातींची गाढवं विक्रीसाठी आली आहेत. यंदा काठेवाडी, लसण्या गाढवांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसते.

टॅग्स :NandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्र