यशवंत परांडकरनांदेड : महाराष्ट्राला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि अद्वितीय स्थापत्यशैलीमुळे महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या राज्यातील ५० तीर्थक्षेत्रांवर माहितीपटाची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ३ डिसेंबर २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या माहितीपटाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने ४ कोटी ६२ लाख रुपये इतक्या भरीव रकमेला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन आणि सांस्कृतिक स्थळांना प्रोत्साहन मिळणार आहे.
शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या संदर्भात सविस्तर अध्यादेश निर्गमित केला आहे. माहितीपटात समाविष्ट करण्यात येणाऱ्या ऐतिहासिकदृष्ट्या व स्थापत्यदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या खालील ५० तीर्थस्थळांचा समावेश आहे.
पुणे जिल्हा : नागेश्वर मंदिर (खिरेश्वर, ता. जुन्नर), मोरया गणपती (वडगाव काशिमबेग, ता. आंबेगाव), रामलिंग मंदिर (शिरूर, ता. शिरूर), सोमेश्वर (सासवड, ता. सासवड), नारायणेश्वर (नारायणपूर, ता. पुरंदर).
सातारा जिल्हा : कात्रेश्वर (कातरखटाव) व सोमलिंग (गुरसाळे, ता. खटाव), केदारेश्वर (परळी) व गणपती (अंगापूर, ता. सातारा).
सांगली जिल्हा : वाटेगाव कऱ्हाड (वाटेगाव, ता. वाळवा), महादेव मंदिर (इरली) व महादेव मंदिर (कुची, ता. कवठेमहांकाळ)
रत्नागिरी जिल्हा : व्याडेश्वर (गुहागर, ता. गुहागर), संगमेश्वर (संगमेश्वर, ता. संगमेश्वर), कनकादित्य (कशेळी, ता. राजापूर) आणि शिव मंदिर-रामेश्वर (काळबादेवी, ता. रत्नागिरी),सिंधुदुर्ग : सातेरी (मातोंड/सातेरी, ता. वेंगुर्ला)
कोल्हापूर जिल्हा : महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर), पळसंबे (पळसंबे, ता. गगनबावडा) आणि ओंकारेश्वर (कोल्हापूर)
ठाणे जिल्हा : महादेव मंदिर (लोनाड, ता. भिवंडी)
उस्मानाबाद जिल्हा : माणकेश्वर (माणकेश्वर, ता. माणकेश्वर)
सोलापूर जिल्हा : माढेश्वरी (माढा, ता. माढा), शिव मंदिर, कोरवली; पंढरपूर शहर (ता. पंढरपूर)
बीड जिल्हा : विठ्ठल महादेव मंदिर (चिंचवण, ता. धारूर), लक्ष्मी-विष्णू मंदिर (मंजरथ, ता. माजलगाव), रामेश्वर-शुक्लतीर्थ (लिंबगाव, ता. बीड), बाराखंबी (अंबेजोगाई)
लातूर जिल्हा : सदाशिव (भूतामुगली) व नीळकंठेश्वर महादेव (निलंगा), विठ्ठल मंदिर, (पानगाव, ता. लातूर)
नांदेड जिल्हा : महादेव मंदिर (येवती, ता. धर्माबाद)
अहिल्यानगर जिल्हा : विठ्ठल रुक्मिणी मंदिर (श्रीगोंदा) व भवानी जगदंबा मंदिर (टाहाकरी, ता. अकोले)
जालना जिल्हा : खंडोबा बिलकेश्वर (चिंचखेड, ता. अंबड)
छत्रपती संभाजीनगर जिल्हा : सिद्धेश्वर मंदिर (अकोले), सिद्धेश्वर मंदिर (कनकावती, ता. कन्नड)
परभणी जिल्हा : त्रिदल/पिंगळेश्वर शिव मंदिर (पिंगळी, ता. परभणी)
हिंगोली जिल्हा : कानिफनाथ गड, (खैरी घुमट, ता. सेनगाव)
अमरावती जिल्हा : खंडेश्वर (नांदगाव खंडेश्वर)
बुलढाणा जिल्हा : शिव मंदिर (धोत्रा नांदाई, ता. देऊळगाव राजा), वैष्णव मंदिर (कोठाळी, ता. पिंपळगाव राजा), सदाशिव मंदिर-बुधनेश्वर (मढ, ता. बुलढाणा)
वाशिम जिल्हा : बालाजी (वाशिम शहर)
यवतमाळ जिल्हा : कमलेश्वर शिव मंदिर (लोहारा, ता. यवतमाळ), शिव मंदिर (पिंपरी कलागा, ता. नेर परसोपंत), दक्षेश्वर (लालखेड) व शिव मंदिर (चिकन खुर्द, ता. दारव्हा)
भंडारा जिल्हा : वाळकेश्वर मंदिर (वाकेश्वर, ता. मोहाडी)
कार्यपद्धतीनुसार माहितीपट तयार करण्याचे निर्देशहा माहितीपट माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संचालक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये यांना या प्रकल्पासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या माहितीपटाद्वारे महाराष्ट्रातील समृद्ध सांस्कृतिक आणि स्थापत्य वारसा देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
Web Summary : Maharashtra government approves ₹4.62 crore for documentaries on 50 historical pilgrimage sites. The project aims to promote tourism and showcase the state's cultural heritage, including 13 ancient temples in Marathwada. The documentaries will follow guidelines set by Directorate General of Information and Public Relations.
Web Summary : महाराष्ट्र सरकार ने 50 ऐतिहासिक तीर्थस्थलों पर वृत्तचित्रों के लिए ₹4.62 करोड़ मंजूर किए। परियोजना का उद्देश्य पर्यटन को बढ़ावा देना और मराठवाड़ा के 13 प्राचीन मंदिरों सहित राज्य की सांस्कृतिक विरासत को प्रदर्शित करना है। वृत्तचित्र सूचना एवं जनसंपर्क महानिदेशालय द्वारा निर्धारित दिशानिर्देशों का पालन करेंगे।