शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रोहीपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टराची दांडी,बालकाचा मृत्यू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:48 IST

तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान पाच वर्षीय बालकास झटके येत असल्याने दाखल करण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याने उपचाराअभावी बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ, नातेवाईकांनी करुन रुग्णालयास टाळे ठोकले. संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुदखेड : तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान पाच वर्षीय बालकास झटके येत असल्याने दाखल करण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याने उपचाराअभावी बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ, नातेवाईकांनी करुन रुग्णालयास टाळे ठोकले. संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठविण्यात आले.गुरुराज गजानन शिंदे(वय ५ रा. रोहीपिंपळगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. त्याला आईवडिलांनी १६ रोजी सकाळी ६.३० च्या दरम्यान रोहीपिंपळगाव येथील प्रा.आ. केंद्रात दाखल केले. कर्तव्यावरील एमपी एमपीडब्ल्यू कर्मचारी निलपत्रेवार यांनी त्याला दाखल करुन घेतले. मात्र निलपत्रेवार यांच्याशिवाय इतर अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित नसल्याने बालकावर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. काही नातेवाईकांनी तालुका आरोग्य अधिकारी पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मोबाईल उचलला नाही, असा आरोप कुटुंबियांचा आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाºयांना घटनेची सविस्तर माहिती भ्रमणध्वनीवरून दिली़ त्यावरून नऊ वाजून दहा मिनिटाला डेपोटेशनवर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. अमजद खान हे रुग्णालयात हजर झाले व गुरुराज गजानन शिंदे यास तपासणी केली असता तो मयत झाला असल्याचे आढळून आल्याने वैद्यकीय अधिका-यांनी मयत घोषित केले.घटनेची माहिती वाºयासारखी गावात पोहोचली. संतप्त नागरिकांंनी धाव घेवून रुग्णालयास टाळे ठोकले. रुग्णालयापुढे मयत गुरुराज शिंदे याचा मृतदेह ठेवून संबंधित अधिकारी, कर्मचा-यांचा निषेध केला. यावेळी माजी जि. प. सदस्य गणेशराव शिंदे, तालुका उपप्रमुख पिंटू पाटील वासरीकर, आनंदराव शिंदे, माधवराव शिंदे, पुंडलिक शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, चक्रधर शिंदे, गुरुराजचे वडील गजानन शिंदे आदी उपस्थित होते. मयतावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, एका शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्याधिकाºयांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.

मी रजेवर असून माझ्या सासूबाई मयत झाल्यामुळे मी मुंबई येथे आलो. रोहीपिंपळगाव येथील घटनेबद्दल फोनवरच प्राथमिक माहिती मिळाली. माझ्याकडे सविस्तर माहिती उपलब्ध नाही़ मी मुदखेड येथे आल्यावर सर्व बाबींची माहिती देईल. -डॉ.राजेंद्र पवार, तालुका आरोग्य अधिकारी मुदखेड़

टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यूHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल