शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी बलिदान देण्याची घाई करू नका - चिखलीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 16:41 IST

नेक वर्षापासून जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवलेला आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच सोडवतील, त्यामुळे आपला जीव गमावू नका, असे आवाहन आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले़

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मावळ्यांनी बलिदान देण्याची घाई करू नये़ अनेक वर्षापासून जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवलेला आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच सोडवतील, त्यामुळे आपला जीव गमावू नका, असे आवाहन आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले़

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २ आॅगस्ट रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आ. चिखलीकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़ आरक्षणाच्या मागणीला आपलाही पाठिंबा असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले़ मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे़ नांदेड जिल्ह्यातही समाजाच्या भावनेचा उद्रेक झाला आहे़ आरक्षणाच्या मागणीसाठी ३० वर्षापासून मराठा समाज संघर्ष करीत आहे़ प्रत्येकवेळी आघाडी सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्षच केले़ 

शहानिशा करून गुन्हे नोंदवावी मराठा आरक्षणासह धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही तत्काळ मार्गी काढावा अशी आपली मागणी आहे़ मराठा समाजाच्या आंदोलनात काही विध्वंसक शक्ती शिरल्या असून निरपराध लोकांना त्याचा त्रास होत आहे़ आंदोलनाचे गुन्हे दाखल करताना शहानिशा करूनच प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली

आरक्षणाचा तिढा लवकर सुटेल मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल, शासकीय मालमत्तेचे कोणीही नुकसान करू नये, आपला जीव गमावू नये, आणखी थोडेदिवस वाट पहा, हा प्रश्न लवकरच निकाली निघेल, असेही आज चिखलीकर म्हणाले. मराठा आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील़ मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आपण ठाम असल्याचेही ते म्हणाले़ 

राजीनामा दिल्याने प्रश्न सुटत नाहीत आरक्षणाच्या मागणीसाठी आपण राजीनामा देणार काय, या प्रश्नाच्या उत्तरावर ते म्हणाले, विधान मंडळ हे सर्वोच्च सभागृह आहे़ विधान मंडळातच सर्व प्रश्न सोडवता येतात़ राजीनामा दिल्याने प्रश्न सुटत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले़ 

श्रेयाच्या लढाईसाठी चढाओढमराठा आरक्षणाचा प्रश्न १९ जुलै रोजी विधान मंडळात विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडला़ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील यांनी या चर्चेत भाग घेतला होता़  त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात आरक्षणासंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली़ तसेच आणखी काही सूचना असतील तर सांगा, असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले होते़ यावेळी विधान मंडळात एकाही सदस्याने मत मांडले नाही़ अधिवेशन संपल्यानंतर मात्र आंदोलन केले जात आहे़ श्रेयवादासाठी हे आंदोलन सुरू असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले़ 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणState Governmentराज्य सरकारChief Ministerमुख्यमंत्री