शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याचा कॅनव्हॉस सोडून मोबाईल स्क्रीनमध्ये गुंतू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 17:57 IST

स्मार्ट फोनचा वापर काहीतरी नावीन्यपूर्ण किंवा कृतिशील गोष्टीसाठीच करा. कमीत कमी दोन तास फोन बंद ठेवा

- विशाल सोनटक्के

आजकाल प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुंतलेला दिसतो. चिमुकल्या मुलांना तर या स्मार्ट फोनची इतकी सवय झाली आहे की, मोबाईलशिवाय त्यांना करमतही नाही. मुलांतील ही बेचैनी धोकादायक आहे. समुपदेशक डॉ. श्रीकांत भोसीकर यांच्याशी साधलेला संवाद.

प्रत्येकाला आपल्या हातात कायम मोबाईल असावा, असे वाटते. मात्र याच सवयीमुळे मानसिक ताण निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यात कितपत तथ्य आहे?स्मार्ट फोनने दाखवून दिले आहे की, मनुष्य किती वाहत जातो. आपण आपल्या आयुष्याचा भलामोठा कॅनव्हॉस सोडून पाच इंची स्क्रीनमध्ये अडकून पडलो आहोत.  सध्या डिजिटल डिस्ट्रॅक्शनमुळे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे अवघड झाले. त्यातून चिडचिडपणा निर्माण होऊन मानसिक ताण वाढत जातो. 

मनापासून प्रयत्न केल्यानंतर मोबाईलपासून दूर जाता येईल काय ?लग्न जोडणाऱ्या स्मार्ट फोनमुळे काहींचे संसार कायमचे तुटल्याचीही उदाहरणे आहेत. नात्यांपेक्षा स्मार्ट फोन काहींना जास्त जवळचा वाटू लागला आहे. सोशली फार कनेक्टेड असणारे प्रत्यक्षात खूपच एकटे असल्याचे दिसते.  आधी डेटा फ्री झाला आणि मग नाती सुद्धा. डेटा संपल्यानंतर रिचार्ज करता येईलही, परंतु नात्यांचे काय? त्यामुळे या संदर्भात ठोस पाऊले उचलण्याची वेळ आली आहे. कोणतीही चांगली सवय लागायला प्रयत्न करावे लागतात आणि वेळही लागतो. 

स्मार्ट फोनचा वापर  कसा करायला हवा?स्मार्ट फोनचा वापर जाणीवपूर्वक करा. फोन कामासाठी हातात घेतला आहे, याचे भान ठेवले पाहिजे. काम संपल्यानंतर फोन दूर ठेवता आला पाहिजे. थोडावेळ जरी जास्त फोन हातात राहिला तर लगेचच इतर आॅनलाईन गोष्टीमध्ये आपण भरकटून जातो. मी पुन्हा सांगतो, स्मार्ट फोनचा वापर नावीन्यपूर्ण किंवा कृतिशील गोष्टीसाठीच करा. आॅनलाईन न्यूज, न्यूजअ‍ॅपचा वापर थांबवा म्हणजे सतत ब्रेकींग न्यूजसाठी फोन घ्यावा लागणार नाही. त्यापेक्षा वर्तमानपत्र खरेदी करा,  कामाची व खरी माहिती मिळेल.

संभाव्य धोके टाळण्यासाठी हे करायलाच हवे प्रत्येकाने दिवसातला काहीकाळ आपला फोन बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा. सुरुवात थोड्यापासून केली तरी चालेल. संध्याकाळी ठरावीक वेळेनंतरच फोन हातात घेण्याचे ठरवा. रात्री आठनंतर स्मार्ट फोनचा वापर फक्त कॉल करणे किंवा रिसीव्ह करण्यासाठी करा. सर्व नोटीफिकेशन, व्हायब्रेशन बंद करा. केवळ रिंगटोन चालू असावी म्हणजे तुमचे लक्ष प्रत्येकवेळी फोनकडे जाणार नाही. वापर नसलेले डाक्युमेंटस्, अ‍ॅपस् डिलीट करा. वॉकला जाताना फोन सोबत घेऊ नका. वेळ पाहण्यासाठी घडी वापरा. अलार्मसुद्धा  वेगळा असू द्या. 

ज्या तंत्रज्ञानामुळे हजारो किलोमीटरचे अंतर कमी झाले. त्याच तंत्रज्ञानाने आपल्यासमोर बसलेल्या व्यक्तीतील अंतर वाढविण्याचे काम केले आहे. आजच्या दैनंदिन धावपळीतील मिळणारा वेळही आपण मोबाईलमुळे कुटुंबाला देत नाही.  

टॅग्स :MobileमोबाइलSocial Mediaसोशल मीडियाNandedनांदेड