शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी अनुदानातून कपात करत जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 18:42 IST

वाह रे जिल्हा बँक...दुष्काळी अनुदानातून कपात करून शेतकऱ्यांनावर अन्याय

ठळक मुद्देदुष्काळी अनुदानातून हजार रुपये कापण्यावर जिल्हा बँक ठाम कपात न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशही डावले

उमरी : शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानातून एक हजार रुपये कपात करण्याचा प्रश्न आता चव्हाट्यावर आला असून ही कपात करण्यात येऊ नये असे आदेश  जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेला दिले असले तरीही बँकेने मात्र या पत्राला जुमानले नाही. दुष्काळी अनुदानातून  एक हजार रुपये कपात करण्याचा सपाटा बँकेने चालूच ठेवला असून कुणाकडेही गेलात तरी काहीच फायदा होणार नाही असे उद्धटपणे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे .

गेल्या चार दिवसांपासून उमरी तालुक्यातील शेतकरी आपले गाऱ्हाणे घेऊन तहसीलदारांकडे खेटे घालीत आहेत.   गुरुवारी  तहसिलदारांनी हा प्रश्न जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना प्रत्यक्ष भेटून सांगितला . त्यावर जिल्हाधिकारी   यांनी एक विशेष पत्र जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेला पाठविले.  याउपरही आज २९ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी दुष्काळी अनुदानातून कपात करण्याचा सपाटा चालूच  होता.  याबाबत पुन्हा शेतकऱ्यांनी उमरी   येथील जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक यांना एक हजार रुपये कपात करू नये अशी विनंती केली . मात्र त्यांनी पुन्हा उद्धटपणे शेतकऱ्यांना हुसकावून लावले. आमच्या वरिष्ठांच्या लेखी आदेशाशिवाय आम्ही कुणाचेही ऐकणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला.  

या सर्व प्रकाराने शेतकरी मात्र पुरता गोंधळून गेलेला आहे.  गतवर्षीच्या अवर्षणामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे . तसेच यावर्षी अतिवृष्टी झाली . त्यामुळे हाताशी आलेल्या खरीप  पिकांचे मोठे नुकसान झाले . सरकारकडून  आलेले अनुदानही शेतकऱ्यांच्या हातात देताना बँक  आडकाठी करीत  आहे . अशा परिस्थितीत ही समस्या  सांगावी  तरी कुणाला ?  असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. तहसीलदार , जिल्हाधिकारी या कुणाचेच बँक मॅनेजर  ऐकत नाहीत. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांना गुमानपणे  पैसा बँकेला  दिल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. 

शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार अर्धा एकर तसेच एक  एकर शेती  असणाऱ्या  लहानात लहान शेतकऱ्यालाही दुष्काळी अनुदानाची मदत मिळावी . त्याला काही अंशी दिलासा मिळावा. या माध्यमातून  शेतकऱ्यांची  गरज भागावी. असे शासनाचे धोरण आहे. मात्र त्यातूनही बँक हजार रुपये कपात करीत असल्यास हजार- बाराशे रुपये अनुदान आहे. यामुळे छोट्या  शेतकर्‍याच्या   हातात काहीच पडणार नाही. हा प्रकार अन्यायकारक असून शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीNandedनांदेडfundsनिधीNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडbankबँक