शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या पिकावर नांगर फिरवलेल्या शेतक-यांशी आणेवारीसंदर्भात जिल्हा कृषीअधिका-यांनी घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 15:57 IST

जिल्हा कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी माळाकोळी येथे भेट देऊन प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधला.

ठळक मुद्दे जिल्हा कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. विजयकुमार भरगंडे यांनी उभ्या पिकात नांगर फिरवलेल्या शेतात पाहणी केली व संपूर्ण माहिती घेतली़ यावेळी सोयाबीन,  तूर, कापूस या पिकाची त्यांनी बारकाईने पाहणी केली व आणेवारीची वास्तविकता आपण जिल्हाधिकारी यांना सांगणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नांदेड : माळाकोळी येथे पीक आणेवारी चुकीची काढल्यामुळे शेतक-यांनी प्रशासनाच्या निषेधात  वाजत गाजत उभ्या पिकावर नांगर फिरवला होता. तसेच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करुन १३ नोव्हेंबर रोजी शिवाजी चौकात आंदोलन केले होते़ याची दखल घेऊन जिल्हा कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी माळाकोळी येथे भेट देऊन प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधला.

१४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. विजयकुमार भरगंडे यांनी माळाकोळी येथे भेट देऊन प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली व शेतक-यांशी संवाद साधला़ यावेळी त्यांनी मोहन शुर, उत्तम घुगे, अर्जुनसिंह बयास यांच्या शेतातील उभ्या पिकाची तसेच उभ्या पिकात नांगर फिरवलेल्या शेतात पाहणी केली व संपूर्ण माहिती घेतली़ यावेळी सोयाबीन,  तूर, कापूस या पिकाची त्यांनी बारकाईने पाहणी केली व आणेवारीची वास्तविकता आपण जिल्हाधिकारी यांना सांगणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी बंटी तिडके या शेतक-याने परतीच्या मान्सूनमुळे खराब झालेले सोयाबीन दाखवले व ८०० रुपये क्विंटल भाव मिळत असल्याचे सांगितले़.

तालुका कृषी अधिकारी विश्वंभर मंगनाळे, सरपंच जालींदर कागणे,  ज्ञानेश्वर गीते, पर्यवेक्षक सदानंद पोटपल्लेवार, कृषी सहायक बालाजी चिखलीकर, शामसिंह बयास, विठ्ठल जिलेवाड, शंकर तिडके, बालाजी तिडके,  बंडु केंद्रे, आदीनाथ मुस्तापुरे,  राजु फुलारी,  अर्जुनसिंह बयास,  सुधाकर राठोड,  जगन्नाथ तिडके, निळकंठ तिडके, रघनाथ मोरे विनायक जोशी, राम पवार,  व्यंकटराव पवार  यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा कृषी अधिकारी डॉ़ तुकाराम मोटे म्हणाले, या भागातील जमीन ही कोरडवाहू व हलक्या प्रतीची असून जूनपासून दोनवेळा पावसाचा पडलेला खंड व पिकावर पडलेले रोग यामुळे या भागातील पिकांचे नुकसान झाले असून आणेवारी संदर्भात आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन वास्तव परिस्थितीचे कथन करणार असल्याची माहिती उपस्थित शेतक-यांना दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेड