शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धर्माबाद तालुक्यात २ हजार हेक्टर तूर धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:06 IST

पाच दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेच्या अभावामुळे हाताशी आलेल्या तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे.

धर्माबाद : पाच दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेच्या अभावामुळे हाताशी आलेल्या तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे धर्माबाद तालुक्यातील शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत.खरीप हंगामात पाऊस कमी झाल्याने कापूस या पिकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्याच सोबत शहर व परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तुरीला शेंगा, फुलांची लागवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे फुलगळ व शेंगा पोखरणाºया अळीच्या प्रादुभार्वामुळे शेतकºयांना पुन्हा नुकसानीचा सामना करावा लागत आहे. तूर पिकांची फुले गळणे सुरू झाले असून, पाने खाणारी अळी, शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव पिकावर झाला आहे. यामुळे पीक उत्पादनात मोठी घट होण्याची भीती असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.या शेंगा पोखरणाºया आळीवर नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणीचा पर्याय असला तरी, ढगाळ वातावरणामुळे गळणारी फुले थांबविण्यासाठी कोणताच पर्याय नाही. त्यामुळे पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात गट होण्याची भीती आहे. आता ढगाळ वातावरणा बरोबरच धूके पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या पिकावरील संकट अधिकच वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.याबाबत धर्माबादचे तालुका कृषी अधिकारी अरविंद जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासाठी शेतकºयांनी त्वरित किटकनाशकांची फवारणी करून घ्यावी. शेतकºयांना याबद्दल मार्गदर्शन तालुका कृषी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अरविंद जाधव यांनी दिली आहे.तीन मंडळातंर्गत २ हजार ४२ हेक्टर तुरीची लागवडधर्माबाद तालुका कृषी कार्यालयातंर्गत तीन मंडळ असून धर्माबाद मंडळामध्ये ५३४ हेक्टर तुरीची लागवड करण्यात अली आहे. याबरोबर जारीकोट मंडळामध्ये ७५४ हेक्टर आणि करखेली मंडळातंर्गत ७५४ हेक्टरमध्ये तुरीची लागवड करण्यात आली आहे. धर्माबाद तालुक्यात एकूण २ हजार ४२ हेक्टरमध्ये तुरीची लागवड करण्यात आली असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.उत्पादनात घट होणारतूर पिकांची फुले गळणे सुरू झाले असून पाने खाणारी अळी, शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुभार्व पिकावर झाला आहे़ यामुळे पीक उत्पादनात मोठी घट होण्याची भिती शेतकºयांना व्यक्त केली़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती