शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

धनगर समाजाचे राज्यभर आंदोलन, ९१ एल्गार मोर्चे निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:26 IST

महाराष्ट्रात दोन कोटींपेक्षा जास्त धनगर समाज असून हा समाज पूर्वीपासूनच भटके व आदिवासी जीवन जगत आला आहे़ या समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षणाची नितांत गरज आहे़ यासाठी धनगर आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन व ९१ एल्गार मोर्चे निघणार आहेत, अशी माहिती धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली.

ठळक मुद्देधनगर आरक्षण एल्गार मेळावा, हजारोंचा जनसमुदाय मेळाव्याला उपस्थित

मुखेड : महाराष्ट्रात दोन कोटींपेक्षा जास्त धनगर समाज असून हा समाज पूर्वीपासूनच भटके व आदिवासी जीवन जगत आला आहे़ या समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षणाची नितांत गरज आहे़ यासाठी धनगर आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन व ९१ एल्गार मोर्चे निघणार आहेत, अशी माहिती धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली.मुखेड धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने शहरातील जि.प हायस्कूल मुलींची शाळा येथे २७ जानेवारी रोजी धनगर आरक्षण एल्गार मेळावा घेण्यात आला. या वेळी जिल्हाभरातून हजारोंचा पिवळा जनसागर उपस्थित झाला होता. कार्यक्रमास धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर, माजी जि़प़अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, प्रा.डॉ. यशपाल भिंगे, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मंडलापूरकर, सचिव डॉ.रामराव श्रीरामे, सभापती अशोकराव पाटील रावीकर, जि़प़सदस्या गंगासागर सुगावकर, विजय पाटील सुगावकर, माजी नगरसेवक जगन्नाथ कामजे, अ‍ॅॅड़शिवराज पाटील कुंद्राळकर, माणिकराव लोहगावे, चंद्रसेन पाटील, दिलीप बंदखडके उपस्थित होते. पडळकर म्हणाले की, सत्ताधारी सरकारने धनगर समाजाला आरक्षण देणार असे आश्वासन दिले होते, मात्र साडेचार वर्षे झाली, आरक्षण मात्र देण्यात आले नाही, असे सांगून सरकारला जागविण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे नमूद केले.यावेळी उपस्थितांची भाषणे झाली. प्रास्ताविक भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर तर सूत्रसंचालन बालाजी नाईक व शिवाजी कोनापुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पं.स. सदस्य व्यंकटराव दबडे, डॉ. पांडुरंग श्रीरामे, संभाजी पा. मावलीकर, जयवंत तरंगे, काशीनाथ येवते, पप्पू इमडे, व्यंकटराव पा. बेन्नाळकर, संजयसिंह देवकते, व्यंकटराव पा. हाळणीकर, उमेश इमडे, संभाजी मुकनर, विठ्ठलराव देवकते, हणमंत नरोटे, गणेश बिरु, सचिन श्रीरामे, माधव देवकते यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :NandedनांदेडDhangar Reservationधनगर आरक्षणagitationआंदोलन