शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची रिक्षा उलटली; दोघे जागीच ठार

By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Updated: November 1, 2022 15:30 IST

भाविक आज सकाळी तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील आडली देवीच्या दर्शनाला रिक्षातून जात होते.

शिवणी (जि. नांदेड) : बोधडी येथील भाविक तेलंगणातील आडेली देवीच्या दर्शनासाठी जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटून दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात किनवट तालुक्यातील शिवणी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या झळकवाडी गावाजवळील घाटात मंगळवारी (दि.१) सकाळी दहा वाजेच्या सुमारास झाला.

बोधडी, ता. किनवट येथील भाविक आज सकाळी तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील आडली देवीच्या दर्शनाला रिक्षातून जात होते. जलधरा ते झळकवाडी मार्गावर असणाऱ्या झळकवाडी येथील उतार असलेल्या घाटात चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटली. या अपघातात बालाजी पांडुरंग खोकले (१९) व नागेश रामा टारपे (२०) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले असून इतर जखमी झाले आहेत. त्यांना शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. 

ऑटो चालक गणेश गवळे, सुनील रामा टारपे, विशाल चंद्रकांत टारपे, विजय सुरेश टारपे, शंकर डुकरे, वसंत डुकरे, मारुती बोंबले या जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले व नंतर अधिक उपचारासाठी हिमायतनगरकडे रवाना करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच इस्लापूरचे सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत, सहायक पोलीस उपनिरीक्षक ए.एस. शेख व बीट आमदार संदीप साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. 

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघात