शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

आयुक्ताअभावी महापालिकेचे बजेट लांबणीवर; दैनंदिन कामकाजावरही परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 4:38 PM

महापालिका आयुक्त महिनाभरापासून रजेवर

ठळक मुद्देनांदेड महापालिकेचा पदभार १४ फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा वाऱ्यावर आहे.महापालिकेत शासन नियुक्त एक उपायुक्त सध्या कार्यरत आहेत.मनपाचा कारभार सध्या प्रभारीवर सुरू आहे.

नांदेड : महापालिकेचा पदभार कोणाकडेही नसल्याची अभूतपूर्व परिस्थिती नांदेडमध्ये दुसऱ्यांदा उद्भवली आहे. गेल्या महिनाभरापासून आयुक्त नसल्यामुळे कारभार तर थंडावला आहेच ; पण आता आगामी आर्थिक वर्षातील नियोजनही कोलमडते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी हे २६ डिसेंबरपासून वैद्यकीय कारणास्तव रजेवर गेले आहेत. त्यानंतर तब्बल १४ दिवस महापालिकेचा पदभार कोणाकडेही सोपविला नव्हता. त्यामुळे महापालिकेसारखी स्थानिक स्वराज्य संस्था अधिकाऱ्याविनाच कार्यरत होती. अखेर ९ जानेवारी २०२० रोजी महापालिकेचा पदभार तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे सोपविला. याच कालावधीत १३ फेब्रुवारी रोजी परभणीचे जिल्हाधिकारी पी. सिवा शंकर यांची नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश धडकले. त्यात पुन्हा ४८ तासांतच फेरबदल होताना १५ फेब्रुवारी रोजी लातूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नांदेड जिल्हाधिकारीपदी बदली झाली. ते १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारीपदी रुजूही झाले.

महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार असलेल्या अरुण डोंगरे यांच्या बदलीचे आदेश १४ फेब्रुवारी २०२० रोजी आले. डोंगरे यांची शिर्डीच्या श्री साईबाबा विश्वस्त समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली.  त्यामुळे मनपात सध्या जबाबदार अधिकारी कोणीही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा फटका मनपाच्या दैनंदिन कारभारावर पडत आहे. सध्या कोणाचे कोणावर नियंत्रण नसल्याचीही परिस्थिती उद्भवली आहे. त्याचवेळी धोरणात्मक निर्णयही घेतले जात नाहीत. विशेष म्हणजे, महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासनाकडून २० फेब्रुवारीपर्यंत स्थायी समितीकडे येणे अपेक्षित होते. मात्र, आयुक्तांअभावी ही प्रक्रिया अद्याप सुरूच झाली नसल्याचे चित्र आहे. 

लेखा विभागाकडून याबाबत कोणतीही प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात महापालिकेच्या खर्चाचे नियोजन कसे राहील? ही बाबही प्रश्नार्थकच आहे. महापालिका आयुक्त आल्याशिवाय अर्थसंकल्पाला गती मिळणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यातच महापालिकेची सर्वसाधारण सभाही आयुक्तांअभावी घेतली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व बाबींचा मनपाच्या कारभारावर परिणामच झाला आहे.

प्रशिक्षणार्थी उपायुक्तांवरच कारभारनांदेड महापालिकेचा पदभार १४ फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा वाऱ्यावर आहे. अकरा दिवसांपासून मनपा अधिकाऱ्याविना चालत आहे. महापालिकेत शासन नियुक्त एक उपायुक्त सध्या कार्यरत आहेत. त्यातही ते अधिकारी प्रशिक्षणार्थीच आहेत. उर्वरित तीनही उपायुक्त  प्रभारी आहेत. महापालिकेत दोन शासननियुक्त सहायक आयुक्त नुकतेच रुजू झाले आहेत. तेही प्रशिक्षणार्थीच आहेत. त्यामुळे मनपाचा कारभार सध्या प्रभारीवर सुरू आहे. या प्रभारी कारभाराबाबत शहरवासीयांमध्ये नाराजी असताना आता महापालिकेला प्रभारी आयुक्तही मिळू नये, याबाबतही नवलच होत आहे. शासनस्तरावरही महापालिकेसारखी संस्था वाऱ्यावर सोडली जात आहे. ही बाबही गंभीरच आहे. यापूर्वीही चौदा दिवस महानगरपालिका अधिकाऱ्यांविनाच चालली होती.४महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी हे २६ डिसेंबरपासून वैद्यकीय कारणास्तव रजेवर गेले आहेत. त्यानंतर तब्बल १४ दिवस महापालिकेचा पदभार कोणाकडेही सोपविला नव्हता. 

टॅग्स :Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाBudgetअर्थसंकल्पNandedनांदेड