शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात आरोग्यसेवेचा उडाला बोजवारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:59 IST

ग्रामीण भागात सध्या थंडी, तापाच्या रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे़ लहान बालक, तरुण, वृद्ध नागरिक आजाराने त्रस्त असताना संबंधित आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी या भागाकडे फिरकूनही पाहत नसल्याने आरोग्य सेवेचा मात्र बोजवारा उडाल्याचे चित्र कौठा सर्कलमध्ये दिसत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्ककौठा : ग्रामीण भागात सध्या थंडी, तापाच्या रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे़ लहान बालक, तरुण, वृद्ध नागरिक आजाराने त्रस्त असताना संबंधित आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी या भागाकडे फिरकूनही पाहत नसल्याने आरोग्य सेवेचा मात्र बोजवारा उडाल्याचे चित्र कौठा सर्कलमध्ये दिसत आहे़प्राथमिक आरोग्य केंद्र बारुळअंतर्गत कौठ्यात उपकेंद्र असून वाढती लोकसंख्या पाहून शासनाने १९९५-९६ मध्ये येथे एक वैद्यकीय, ४ कर्मचारी नियुक्त केले होते़ मात्र जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनाने उपकेंद्र बंद अवस्थेत आहे़ कोण कर्मचारी आहे, नाही याचा पत्ता गावकऱ्यांना नाही़ आरोग्य केंद्रावर कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने कर्मचारी उपस्थित राहत नाहीत़ यामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे़कौठा उपकेंद्रावर दोन महिला कर्मचारी, एक पुरुष एमपीडब्ल्यू त्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याने जागा रिक्त आहे़ तर दुसरी महिला कर्मचारी लोहगाव येथून अपडाऊन करत आहे़ ते कधी येतात कधी जातात याची नोंद कुठेच नाही़ गृहभेटी तपासणी करण्यात येत नाही़ सुपरवायझर तर पोलिओ किंवा लसीकरणालाच हजर असतात़ एरव्ही मात्र कोणीच इकडे फिरकत नाहीत़ गावापासून उपकेंद्र १ किमी लांब असल्याने तेथील अवस्था पाहण्यासारखी इमारत शोभेची वास्तु बनले आहे़ परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे़

  • सध्या खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल दिसत आहेत़ कौठा, शिरुर, चौकीमहाकाया, कौठावाडी येथील २० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असताना लोकप्रतिनिधी गप्प असल्याने याचा आर्थिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे़ याचे जिल्हा आरोग्य विभाग लोकप्रतिनिधींना काहीच देणेघेणे नाही का, असा प्रश्न उभा राहत आहे़ शासन एकीकडे गोरगरीब नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी विविध योजना राबवित असताना स्थानिक अधिकारी, पदाधिकारी यांच्या वक्रदृष्टीने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र शोभेची वास्तू बनले आहेत.
टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल