शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुखी कुटुंबावर नियतीचा घाला; १० महिन्यात आईवडील, मुलाचा मृत्यू; धाकट्याचे अश्रू थांबेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 19:40 IST

अपघातात आईचा मृत्यू झाला, गंभीर जखमी मुलाच्या उपचारासाठी घर, जमीन विकली पण यश आले नाही

- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड): मुदखेड तालुक्यातील मेंढका येथील कोरेबैनवाड कुटुंबियांनी अहोरात्र कष्ट घेत प्रगती करून दाखवली. समाजाला कायम दिशा देण्याचे काम या कुटूंबाने केले. पण पहिल्या दुःखद घटनेतून सावरत नाही, तोच दुसरा निरोप येतो अन् या दोन्ही घटनांच्या भावनांना वाट मोकळी होण्यापूर्वीच तिसऱ्यांदाही तशीच बातमी येते. वेळ आली की, प्रत्येकाला जगाचा निरोप घ्यावाच लागतो पण, एकाच कुटुंबातील तिघांचा १० महिन्यात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कोरेबैनवाड कुटुंबीयांसोबत घडली.

दि.१९ ऑक्टोंबर २०२१ रोजी लक्ष्मणराव कोरेबैनवाड यांचे कोरोनाने निधन झाले. कर्ता पुरुष गेल्याच्या दुखातून कोरेबैनवाड कुटुंब कसेबसे सावरले होते. दरम्यान, सहा महिन्यानंतर दि.१६ एप्रिल २०२२ रोजी नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रंजनाबाई आणि कृष्णा यांचा अपघात झाला. यात रंजनाबाई यांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी कृष्णावर नांदेड, हैदराबाद, पुणे येथे उपचार करण्यात आले. उपचारासाठी शेत, जमीन विकली, अनेक मदतीचे हात समोर आले होते. मात्र, तब्बल अर्धा कोटी रुपये खर्च करूनही चार महिन्यांचा प्रदीर्घ उपचारानंतर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या कृष्णाची झुंज अपयशी ठरली. १५ ऑगस्ट रोजी त्याची प्राणज्योत मावळली. कृष्णाच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील चौघांपैकी तिघांचे निधन झाल्याने एकटा पडलेला धाकटा मुलगा गंगाराम उर्फ गुरू वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

आईच्या निधनाची वार्ता माहिती नव्हतीअपघातात जखमी झालेल्या कृष्णाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला आईचा मृत्यू झाल्याचे माहिती दिली नाही. तो आईच्या अंत्यदर्शनालाही मुकला. या परिस्थितीत उपचारादरम्यान काळजावर दगड ठेवून छोटा भाऊ गुरु हा कृष्णाची प्रकृती सुधारावी यासाठी परिस्थितीशी दोन हात करत होता. पण प्रदिर्घ उपचारादरम्यान कृष्णाचे निधन झाले. 

टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यू