शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा धुमाकूळ, दोन गायींवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:29 IST

सदरच्या घटना गावालगतच असलेल्या सुभाष विद्यालयाच्या पाठीमागच्या शेतात घडल्याने शाळकरी मुलांबरोबरच पालक व शिक्षकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाईबाजार : गोकुळगोंडेगाव येथे गावालगत बिबट्याने धुमाकूळ घातला असून सलग दोन दिवसांत दोन गायींवर केलेल्या हल्ल्यात एका गायीचा फडशा पाडला तर दुसरी गाय नागरिकांच्या ओरडण्याने बालंबाल बचावली. सदरच्या घटना गावालगतच असलेल्या सुभाष विद्यालयाच्या पाठीमागच्या शेतात घडल्याने शाळकरी मुलांबरोबरच पालक व शिक्षकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.माहूर तालुक्यातील मौजे गोकुळ गोंडेगाव या गावाशेजारी बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे मागील काही दिवसांपासून बोलले जात होते. या चर्चेला २५ व २६ नोव्हेंबर रोजीच्या दोन घटनांनी चर्चा खरी असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, २५ नोव्हेंबर च्या मध्यरात्री दत्ता गुलाब गावंडे यांच्या गायीवर बिबट्याने हल्ला चढवून गावालगत असलेल्या सुभाष विद्यालयाच्या पाठीमागील शेतात ओढत नेवून तिचा फडशा पाडला़ ही घटना २६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनास्थळास भेट देवून तथा पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू केली. या घटनेस अवघ्या काही तासांचाही अवधी उलटला न् उलटला तेच रात्री ९ वाजेच्या सुमारास पुन्हा बिबट्याने विष्णू नामदेवराव जगताप यांच्या गायीवर हल्ला केला. गायीच्या आवाजाने ही बाब नागरिकांच्या लक्षात आली. तद्नंतर लाठीकाठी व मोठ्या संख्येतील लोकांच्या ओरडण्याने बिबट्याने गायीला सोडून पळ काढला. त्यामुळे जगताप यांची गाय बालंबाल बचावली असली तरी गंभीर स्वरूपात जखमी झाली आहे. सदरच्या दोन्ही घटना अगदी गावाशेजारी असलेल्या सुभाष विद्यालयामागील शेतात घडल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्गात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने लक्ष घालून बिबट्याचा पुरता बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.कुपटी परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोसकुपटी : कुपटी परिसरात वन्यप्राण्यांनी हैदोस घातला.शेतातील उभ्या पिकांची नासाडी केली जात आहे़ यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून आधीच विविध कारणांमुळे अडचणीत असलेला शेतकरी आता वन्य प्राण्यांमुळे त्रस्त झाला आहे़ शेतकरी वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान होवू नये, यासाठी रात्रीला जागल करीत आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडleopardबिबट्याcowगायFarmerशेतकरी