शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बिलोली शहरासह ग्रामीण भागातील ओसाड विहिरी बनल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:53 IST

तालुक्यातील ग्रामीण तथा शहरी भागात पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी विहिरी खोदण्यात आल्या होत्या. परंतु, दिवसेंदिवस जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्याने तसेच नागरिकांनी बोअरवेल जास्त घेतल्याने विहिरींचे पाणी पूर्णपणे आटले आहे.

ठळक मुद्देविहिरींवर लोखंडी पिंजरे टाकणे गरजेचे

बिलोली : तालुक्यातील ग्रामीण तथा शहरी भागात पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी विहिरी खोदण्यात आल्या होत्या. परंतु, दिवसेंदिवस जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्याने तसेच नागरिकांनी बोअरवेल जास्त घेतल्याने विहिरींचे पाणी पूर्णपणे आटले आहे. परिणामी, ओसाड पडलेल्या विहिरी लहान मुले तथा मोकाट गुराढोरांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरत आहेत. त्या ओसाड विहिरीवर स्थानिक प्रशासनाने लोखंडी पिंजरे टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.३० ते ३५ वर्षांआधी पाण्याच्या दृष्टीने घरोघरी विहिरी खोदल्या गेल्या होत्या. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी जनतेचे हित जोपासून ग्रामीण तथा शहरी भागात विहिरींची निर्मिती प्रशासनाने केली होती. त्यामुळे ज्याच्या घरी विहिरी नव्हत्या, त्यांना सार्वजनिक ठिकाणच्या विहिरींवरुन पाणी भरणे सोपे जात होते. पाणी भरण्याच्या दृष्टीने नागरिकांना विहिरींचे अनन्यसाधारण महत्त्व होते.परंतु, दिवसेंदिवस विहिरींतील पाण्याची पातळी खोल गेल्याने ग्रामीण तथा शहरी भागात बोअरवेलची निर्मिती करण्यात आली. त्याद्वारे पिण्याचे पाणी सार्वजनिक नळ तसेच घरगुती नळाद्वारे पोहोचविणे शक्य झाले. त्यामुळे सर्वात आधी घरगुती विहिरी पूर्णपणे आटल्याने त्या माती अथवा स्लब टाकून बुजविण्यात आल्या. परंतु, ग्रामीण तथा शहरी भागात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या ओसाड विहिरी अजूनही उघड्याच आहेत. त्यावर कोणत्याच प्रकारचे लोखंडी पिंजरे नसल्याने मोकाट जनावरे, लहान मुलांच्या जीविताच्या दृष्टीने धोकादायक बनल्या आहेत. धार्मिक सण जसे पतंग उत्सवात मुले पतंग उडवताना तसेच खेळताना इतके मग्न होतात की, पतंगाच्या मागे लागल्याने या ओसाड विहिरींचे शिकार बनतात.या ओसाड विहिरी अतिशय जुन्या असल्याने काठ पूर्णपणे ढासाळले आहेत. परिणामी मुले, जनावरे त्यात पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण तथा शहरी भागातील ओसाड विहिरी ज्या प्रशासनाच्या अंतर्गत येतात त्यावर त्यांनी लोखंडी पिंजरे टाकण्याची मागणी ग्रामीण व शहरी भागातून होत आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणी