शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

नांदेडमध्ये दादा, मामा, भाऊवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:50 IST

शहरात विनाक्रमांकाच्या फॅन्सी नंबरप्लेट लावून धूमस्टाईल दुचाकी पळविणाऱ्या दादा, मामा, भाऊवर शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे़ त्याचबरोबर फटाका आवाज करणा-या ११ बुलेटही जप्त करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे धूमस्टाईल दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत़

ठळक मुद्देवाहतूक शाखेचा दणका : रिक्षाचालकांना गणवेशासाठी ५ जुलैपर्यंतची मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरात विनाक्रमांकाच्या फॅन्सी नंबरप्लेट लावून धूमस्टाईल दुचाकी पळविणाऱ्या दादा, मामा, भाऊवर शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे़ त्याचबरोबर फटाका आवाज करणा-या ११ बुलेटही जप्त करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे धूमस्टाईल दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत़तरुणाईमध्ये सध्या बुलेटची फॅशन आहे़ कंपनीने लावलेले सायलेन्सर काढून किंवा त्यामध्ये छेडछाड करुन फटाका आवाज करणारे सायलेन्सर अनेकांनी आपल्या बुलेट गाड्यांना बसविले आहे़ त्यामुळे रस्त्यावर जाताना या गाड्यांचा मोठा आवाज होता़े या आवाजाचा इतर वाहनधारकांना त्रास होतो़ त्याचबरोबर अनेक दुचाकी विनाक्रमांकाच्याच रस्त्यावरुन धावत आहेत़ दादा, मामा, भाऊ, साहेब असे लिहिलेल्या फॅन्सी नंबरप्लेटनेही धुमाकूळ घातला आहे़ अशा बेशिस्त वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी शहर वाहतूक शाखेने मोहीम सुरु केली आहे़ दररोज जवळपास दीडशे ते दोनशे दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे़ सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या ११ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत़ नो पार्कींगमध्ये लावण्यात येणाºया वाहनांमुळे कोंडी होत असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे़ खाजगी वाहतूक करणारे किंवा विनापरवाना रिक्षाही बंद करण्याचा इशारा पोनि़ चंद्रशेखर कदम यांनी दिला आहे़ वाहतुकीच्या समस्येसाठी ९७६७८६६६८४ या क्रमांकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर माहिती द्यावी़---रिक्षाचालकांमध्ये जनजागृतीशहरात १ जुलैपासून रिक्षाचालकांना गणवेशसक्ती करण्यात आली होती़ याबाबत वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी चौकांमध्ये रिक्षाचालकांमध्ये याबाबत जनजागृती केली़ त्यानंतर विविध रिक्षा संघटनांच्या विनंतीवरुन रिक्षाचालकाच्या गणवेशासाठी ५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़

टॅग्स :Nandedनांदेडtraffic policeवाहतूक पोलीस