शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात प्रथमच आढळली मगर; वनविभागाच्या पथकाने मोठ्या धाडसाने शेतातून पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:51 IST

लोहा तालुक्यातील घोटका येथील शेतकऱ्याच्या शेतात मगर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

- शेखर पाटील मुखेड ( नांदेड) : मुखेड वनपरिक्षेत्रात लोहा तालुक्यातील घोटका येथील एका शेतात मंगळवारी पहाटे १ वाजेच्या दरम्यान दीड वर्षाची नर जातीची मगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने मगरीस शेतातून पकडले आहे. मात्र, शेतात अचानक मगर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.नांदेड जिल्ह्यात प्रथमच मगर आढळून आल्याची माहिती आहे.

घोटका येथील शेतकरी शेषेराव यादव कदम यांच्या शेतात मगर आढळल्याची माहिती सरपंच संग्राम सुरनर यांनी वनपाल धोंडगे यांना मंगळवारी पहाटे दिली. वनपाल शंकरराव धोंडगे, वनरक्षक अरुण राठोड व सर्पमित्र सिद्धार्थ कांबळे, नादान शेख यांनी लागलीच शेतात धाव घेत मगरीस चिमट्याच्या सहाय्याने पकडले. त्यानंतर सकाळी ११ वाजता मुखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मगरीवर डॉ. धनराज मुर्कीकर यांनी प्राथमिक उपचार केले. सध्या ही मगर वनक्षेत्रपाल अधिकारी कार्यालयात ठेवण्यात आली आहे. मगर पकडून कार्यालयात ठेवल्याची वार्ता समजताच शाळकरी मुलांनी पाहण्यासाठी गर्दी केली आहे.

नैसर्गिक अधिवासात सोडणारनांदेड जिल्ह्यात पहील्यांदाच मगर सापडली असून ही मगर नर प्रजाती असून अंदाजे वय दिड वर्ष असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनराज मुर्कीकर यांनी सांगितले. तर वरिष्ठांचे आदेश येताच मगरीस नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपाल शंकरराव धोंडगे यांनी दिली. 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रforest departmentवनविभाग