शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुखेड तालुक्यात प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 19:33 IST

दोघे भिन्न जातीचे असल्याने आत्महत्या केल्याची चर्चा

मुखेड (जि. नांदेड) : मुखेड तालुक्यातील येवती गावापासून २ कि़मी़ अंतरावर असलेल्या  कासारवाडी गावाच्या शिवारात एका प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन २१ फेब्रुवारीच्या रात्री जीवनयात्रा संपविली.

कोळनूर (ता.जळकोट जि.लातूर) येथील रहिवासी गणपती ऊर्फ पारस  निवृत्ती नरवटे अंदाजे (वय २५) व त्याच गावातील धनश्री माधव चोले (अंदाजे वय २०) या दोघांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री मामा खुशाल देवकत्ते यांच्या शेतात चिंचेच्या झाडाला कासारवाडी शिवारात येऊन गळफास घेतला़ २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता दोघांचे मृतदेह झाडाला लटकत असल्याचे जनावरे चारणाऱ्या महिलेच्या  निदर्शनास आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच फौजदार प्रकाश सांगळे,  मिथून सावंत,जमादार सुनील पांडे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. दुपारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. 

मयत गणपती नरोटे हा एम.पी.एस.सी. व पोलीस भरतीची तयारी करत होता तर मयत मुलगी धनश्री पॉलिटेक्निक कॉलेज नांदेड येथे कॉलेजला होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, मात्र ते दोघे भिन्न जातीचे असल्याने घराच्यांचा त्यांना विरोध होता, असे समजले.  यातूनच त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असावा, अशी चर्चा आहे. मुखेड पोलिसांनी राम देवकत्ते यांच्या फिर्यादीवरुन  आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.  उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे,  पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुनील पांडे तपास करीत आहेत. 

टॅग्स :Suicideआत्महत्याNandedनांदेडStudentविद्यार्थी