शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

coronvirus : नांदेड जिल्ह्यात २४ तासात ५ कोरोनाबाधितांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 19:20 IST

जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३ हजार ६९९ एवढी झाली आहे़

ठळक मुद्देजिल्ह्यात आजवर १३४ मृत्यू गुरुवारी जिल्ह्यात ८२ बाधित आढळले

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे़ मागील २४ तासात आणखी पाच जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे़ यामधील चौघेजण नांदेड परिसरातील आहेत़ तर एकजण नायगाव येथील आहे़ या पाच जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या १३४ वर जावून पोहोचली आहे़ दरम्यान गुरुवारी आणखी ८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३ हजार ६९९ एवढी झाली आहे़

कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे़ मात्र त्यानंतरही मृतांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे़ मागील २४ तासात नांदेड शहरातील नाईकनगर येथील ७८ वर्षीय पुरुषाचा, बळीरापूर येथील ३० वर्षीय महिलेचा, धनेगाव येथील ४९ वर्षीय महिलेचा तर दिलीपसिंघ कॉलनी येथील ५८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ नायगाव येथील ५५ वर्षीय व्यक्तीवर नांदेडच्याच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते़ या पुरुषाचाही गुरुवारी मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या १३४ झाली आहे़

गुरुवारी ६२९ अहवाल प्राप्त झाले़ यातील ५२० अहवाल निगेटिव्ह आले तर ८२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले़ यातील १९ बाधीतांची स्वॅब तपासणी तर ६३ जण हे अ‍ॅन्टीजण तपासणीतून बाधीत असल्याचे उघड झाले़ यामध्ये स्वॅब तपासणीत बाधीत आढळलेल्यामध्ये नांदेड मनपा आणि धर्माबाद क्षेत्रातील प्रत्येकी ४, लोहा, देगलूर, नांदेड ग्रामीण येथील प्रत्येकी २, मुखेड ३ तर बिलोली, भोकर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे़ अ‍ॅन्टीजेन चाचणीमध्ये ६३ जण बाधीत असल्याचे पुढे आले़ यामध्ये नांदेड मनपा क्षेत्रातील १६, मुखेड १८, कंधार ६, बिलोली आणि देगलूर येथील प्रत्येकी ४, उमरी आणि किनवट येथील प्रत्येकी २, भोकर, धर्माबाद, परभणी, नायगाव येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांचीसंख्या ३ हजार ६९९ एवढी झाली आहे़

७१ जणांनी केली कोरोनावर मातगुरुवारी जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असलेल्या ७१ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याने या रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे़ त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २ हजार १२७ एवढी झाली आहे़ गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्यामध्ये देगलूर आणि मुखेड कोविड सेंटरमधील प्रत्येकी १५, खाजगी रुग्णालयातील १२, माहूर येथील १०, नायगाव आणि हदगाव येथील प्रत्येकी ८ तर लोहा आणि शासकीय आयुर्वेदीक कोविड केअर सेंटर नांदेड येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे़.

१४१९ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये सध्या १४१९ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत़ यामध्ये विष्णूपुरी येथील वैद्यकीय महाविद्यालयात १८६,  पंजाब भवन सेंटरमध्ये ५१५, जिल्हा रुग्णालय ४०, नायगाव ४३, बिलोली ३१, मुखेड  १२०,  देगलूर  १०१, लोहा १३, हदगाव ३४, भोकर १८, कंधार १४, धर्माबाद ३५, किनवट ३६, अर्धापूर ३४, मुदखेड २४, हिमायतनगर १, माहूर ५, नांदेड आयुर्वेदिक रुग्णालय २९, बारड ४, उमरी कोविड केअर सेंटरमध्ये ५, खाजगी रुग्णालये १२५, औरंगाबाद संदर्भित ४ तर निजामाबाद आणि हैद्राबाद संदर्भित प्रत्येकी १.

टॅग्स :Nandedनांदेडcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू