शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : मुक्त विद्यापीठाचे ठरले; अंतिम वर्षाची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना देणार पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 17:05 IST

विद्यापीठाने अंतिम वर्षात शिकणाऱ्या सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे आहे, असा पर्याय दिला आहे़

ठळक मुद्देयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने घेतला निर्णय  या निर्णयाने नांदेड विभागात २२,५०० विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत

- भारत दाढेल

नांदेड :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता अंतर्गत गुणावर निकाल घोषित करण्याचा निर्णय  घेतला आहे़ त्यामुळे  नांदेड विभागातील लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे २२ हजार ५०० विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत़

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातंर्गत अंतिम वर्षात प्रवेशित असलेल्या अव्यावसायिक शिक्षणक्रमाच्या पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने निर्णय घेवून परीक्षा न घेता पदवी प्रमाणपत्र देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे़ या निर्णयामुळे नांदेड विभागातील पदवीच्या अंतिम वर्षातील २० हजार तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे अडीच हजार विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत़मुक्त विद्यापीठात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा होणार की नाही, असा प्रश्न पडला होता़ मे मध्ये होणाऱ्या परीक्षेसंदर्भात कोणताच निर्णय होत नसल्याने या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा वाढली होती़ अखेर मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे आहे, असा पर्याय दिला आहे़

अशा विद्यार्थ्यांबाबत त्यांच्या प्रथम व द्वितीय वर्षाचा विद्यापीठ मूल्यमापन अंतिम परीक्षेच्या विषयनिहाय गुणांना प्रत्येकी प्रथम वर्ष ८० पैकी ५० टक्के व द्वितीय वर्ष  ८० पैकी ५० टक्के असे एकूण ४० अधिक ४० बरोबर ८० पैकी विद्यापीठ मूल्यमापनाचे तृतीय, अंतिम वर्ष, सत्राचे गुण दर्शविण्यात येतील़ तर अंतर्गत मूल्यमापन  २० पैकी गुण हे अभ्यासकेंद्राकडून आॅनलाईन पद्धतीने मागवून ते २० पैकी दर्शविले जाणार आहेत़ या प्रमाणे तृतीय अंतिम वर्षातील विषयांना गुणदान केले जाणार आहे़   सेमिस्टर पद्धतीतील शिक्षणक्रमांसाठी अंतिम सत्रातील विषयनिहाय गुण हे त्या आधीच्या सत्रातील विषयाचे विषयनिहाय गुण घेवून त्याप्रमाणे दाखवून निकाल लावण्यात येणार आहे़

नांदेड विभागात  २२ हजार ५०० विद्यार्थी उत्तीर्णयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी या चार जिल्ह्यात बी़ ए़, बी़ कॉम़ या पदवी अंतिम वर्षाचे एकूण २० हजार विद्यार्थी आहेत़ तर पदव्युत्तर विषयाचे अडीच हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत, अशी माहिती नांदेड विभागीय कार्यालयातून प्राप्त झाली़ 

टॅग्स :Yashwantrao Chavan Maharashtra Open Universityयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठNandedनांदेडEducationशिक्षण