शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

CoronaVirus : नांदेडमध्ये 'कोरोना व्हायरस' आला कोठून ? पहिल्या रुग्णाच्या 'सोर्स'चा शोध लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 16:44 IST

नांदेडमध्ये  बुधवारी  पीरबुरहाननगर भागात एक 64 वर्षीय  व्यक्तीला  कोरोना झाल्याचे उघड़ झाले. 

ठळक मुद्देआरोग्य  यंत्रणेसह प्रशासनही चक्रावले  आहे.पोलिसी पद्धतीने होणार तपास

- अनुराग पोवळे नांदेड - नांदेडमध्ये सापडलेल्या पहिल्या  कोरोनाच्या  रुग्णाला  हा  संसर्ग  नेमका  कुठून  झाला  याचा  शोध  24 तासानंतरही  लागला  नाही. परिणामी  आरोग्य  यंत्रणेसह प्रशासनही चक्रावले  आहे.

नांदेडमध्ये  बुधवारी  पीरबुरहाननगर भागात एक 64 वर्षीय  व्यक्तीला  कोरोना झाल्याचे उघड़ झाले.  ही  बाब  समजताच महीनाभरापासून  कोरोनाची  तटबंदी  करणाऱ्या  प्रशासनाला मोठा  धक्का  बसला. पीरबुरहाननगर परिसराला  कन्टेनमेंट झोन  म्हणून  घोषीत केल्यानंतर  पोलीस व  आरोग्य  विभागाने 3 किमी चा  परिसर आपल्या  ताब्यात  घेतला. कोरोना रुग्णाचे  जवळपास 14 कुटुंबीय आणि  संपर्कातील इतर 30 ते 35 जणांना विलगीकरण केले. त्यांचे  स्वॅबही  घेण्यात  आले. या  अहवालाची  प्रतिक्षा असताना सदर रुग्णाला  कोरोनाची  लागण  नेमकी  कुठून  झाली  हा प्रश्न  मात्र  अद्यापही  अनुत्तरीतच आहे. 

रुग्ण दोन महिन्यांपासून घरातचकोरोना  झालेल्या  व्यक्तीचे कुटुंबीय कोरोना बाधित व्यक्ति हा  दोन महिन्यांपासून घरातच असल्याचे सांगत आहेत. सदर रुग्णावर  2 खाजगी रुग्णालयात 8 दिवसांपूर्वी उपचार करण्यात  आले  होते. ते  दोन्ही  रुग्णालय  सील  करण्यात आले आहेत. त्या  रुग्णालयाच्या  डॉक्टरलाही क्वारंटाइन केले आहे. एकूणच नांदेडच्या  पहिल्या कोरोना  रुग्णाला लागण नेमकी  कुठून  झाली  याचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे  पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनीही आता पोलिसी पद्धतीने माहिती  घेतली जाईल  असे स्पष्ट  केले.

महापालिकेची युद्धपातळीवर तयारीमहापालिका आयुक्त  डॉ. सुनील  लहाने यांनी या  कन्टेनमेंट झोनमधील नागरिकांचा आरोग्य सर्व्हे  शुक्रवारपर्यंत पूर्ण होईल असे स्पष्ट केले. शहरातील  इतर भागात कोरोना पसरु नये यासाठी महापालिका युद्धपातळीवर उपाययोजना करत असल्याचेही  स्पष्ट केले. दरम्यान, शहरातील भाग्यनगर भागही सील करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड