शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : नांदेड जिल्ह्यातील व्यवहार टप्याटप्याने सुरळीत होणार-जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 20:05 IST

तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हे १७ मे रोजी संपणार आहे. हे सहा दिवस वाट बघण्याची आता गरज नसून मंगळवारी जिल्ह्यातील व्यवहार टप्याटप्याने कसे सुरू केले जातील, याबाबतची माहिती दिली जाणार आहे.

ठळक मुद्देमंगळवारी दिली जाणार याबाबतची अधिक माहिती

नांदेड : कोरोना संकटाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचवेळी आर्थिक घडीही सुरळीत करण्यासाठी आता शहर व जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असून टप्याटप्याने कोण-कोणते व्यवहार करता येतील, याबाबत मंगळवारी विस्तृत माहिती दिली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी स्पष्ट केले. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सोमवारी झूम अ‍ॅपच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी म्हणाले,  जिल्ह्यात कोरोनाचे ५२ रुग्ण आढळले आहेत. यातील ३६ रुग्ण हे श्री लंगर साहिब गुरुद्वारातील आहेत. उर्वरीत रुग्ण शहरातील इतर भाग तसेच माहूर तालुक्यातील एका रुग्णाचाही समावेश आहे. कोरोना रुग्णसंख्या ही कमी-अधिक प्रमाणात वाढत आहे. पण त्याचवेळी औरंगाबाद, यवतमाळ, लातूर, परभणी सारख्या जिल्ह्यानेही आपले व्यवहार काही प्रमाणात सुरू केले आहेत. त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील व्यवहारही सुरू केले जातील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले. 

तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हे १७ मे रोजी संपणार आहे. हे सहा दिवस वाट बघण्याची आता गरज नसून मंगळवारी जिल्ह्यातील व्यवहार टप्याटप्याने कसे सुरू केले जातील, याबाबतची माहिती दिली जाणार आहे. हे व्यवहार सकाळी ७ ते १ किंवा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील हेही स्पष्ट केले जाणार आहे.  शहरातील बॅरीकेटींग काढण्यात येत आहे. ही बॅरीकेटींग आता आवश्यक ठिकाणीच ठेवली जाणार आहे. काही ठिकाणची काढली जाईल तर काही ठिकाणी नव्यानेही बॅरीकेटींग करावी लागेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

श्री लंगर साहिब गुरुद्वारा येथील अडकलेले भाविक व तेथील कर्मचारी यांची तपासणी केली जात आहे. या सर्व प्रक्रियेत लंगर साहिब गुरुद्वाराकडून आवश्यक ते सहकार्य केले जात असल्याचेही ते म्हणाले. लंगर साहिब प्रशासनाला नोटीसचा कोणताही विषय नसल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. लहाने यांनीही शहरातील परिस्थितीबाबत माहिती दिली. प्रशासनाच्या तसेच महापालिकेच्या सुचनांचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कोरोना रुग्णांना आता दहा दिवसात सुट्टीएखाद्या रुग्णाचा रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर त्याला दहा दिवस उपचार दिले जाणार आहेत. त्यानंतर त्याचा अहवाल निगेटीव्ह येताच त्याला रुग्णालयात १४ दिवस क्वॉरन्टाईन ठेवले जात होते. मात्र शासनाच्या नव्या सुचनानुसार निगेटीव्ह रुग्णांना आता दहा दिवसानंतर घरी सोडले जाईल. मात्र त्यांना होम क्वॉरन्टाईन राहण्याच सल्ला दिला जाणार आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड