शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

coronavirus : धक्कादायक ! कामचुकार कर्मचारी कागदोपत्री झाले हृदयरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 21:16 IST

विष्णूपुरी येथील कोविड केअर सेंटरमधील प्रकार

ठळक मुद्देड्युटी टाळण्यासाठी बोगस प्रमाणपत्रांचा आधार

- शिवराज बिचेवार

नांदेड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी हजारचा आकडा पार केला आहे़ अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे़ प्रत्येक ठिकाणी अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे़ असे असताना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून मात्र कोविड सेंटरमध्ये कर्तव्य बजावण्यास नाके मुरडली जात आहेत़ विष्णूपुरी येथील वैद्यकीय महाविद्यालय अन् रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी तर डॉक्टरांची बोगस प्रमाणपत्रेच प्रशासनाकडे सादर केली़ तर काहींनी राजकीय पुढाऱ्यांकडे धाव घेतली़ अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे़डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आजघडीला ८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत़ तर नव्याने ८० खाटांच्या स्वतंत्र कक्षाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे़ त्यामुळे डॉक्टर, परिचारिकांसह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवरील ताण वाढणार आहे़ त्यात अगोदरच रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे़ कंत्राटी पद्धतीवर दीडशे कर्मचारी भरण्याबाबत संचालक कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे़ परंतु, अद्याप त्यांची भरती झाली नाही़ त्यातही कर्तव्यावर असलेले काही जण कोविड कक्षात कर्तव्य बजावण्यास नकार देत आहेत़ त्यासाठी काहींनी आरोग्याची कारणे दिली़

तसेच पुरावा म्हणून खाजगी डॉक्टरांची बोगस प्रमाणपत्रे सादर केली़ तर काहींनी थेट राजकीय मंडळीकडे धाव घेत प्रशासनावरच दबावतंत्र सुरु केले आहे़ त्यामुळे डॉक्टरांचीही मोठी पंचाईत झाली आहे़ याबाबत वर्ग-४ नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे़ या समितीच्या सदस्यांकडून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कोविड तसेच इतर कक्षात नियुक्ती दिली जाते़ आता कोविड कक्षात कर्तव्य बजावण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे़ त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविणार नावेजिल्हाधिकारी डॉ़विपीन ईटणकर यांनी १७ जुलै रोजी रुग्णालयास भेट देवून पाहणी केली होती़ त्यावेळी त्यांनी कोविड ड्युटीसंदर्भात अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच दबावतंत्राचा वापर किंवा कामचुकारपणा करणाऱ्यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयास कळवावी, असे आदेश दिले आहेत़ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही यावेळी देण्यात आला होता़ सध्या विष्णूपुरी येथील रुग्णालयात २४६ चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत़ त्यामध्ये ५५ वर्षे वय असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ५० हून अधिक आहे़ त्यामुळे त्यांना टाळून इतर कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये ड्युटी लावावी लागते़ या ठिकाणी प्रत्यक्षात आणखी २७२ कर्मचाऱ्यांची गरज आहे़समितीने कामचुकार कर्मचाऱ्यांना दिली समजच्कार्यरत असलेले अनेक चतुर्थश्रेणी कर्मचारी हे तरुण आहेत़ परंतु कोविड कक्षात कर्तव्य बजावयाचे म्हटले की त्यांनी खाजगी डॉक्टरांकडून मधुमेह, हृदयरोग यासारखे आजार असल्याचे प्रमाणपत्र समितीपुढे सादर केले़ कर्मचाऱ्यांचा हा बनाव समितीच्या लक्षात आला असून त्यांनी अशा कर्मचाऱ्यांना समज दिली आहे़कोरोना कक्षात ड्युटी न करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अनेक क्लृप्त्या सुरु आहेत़ परंतु फक्त गंभीर आजार असलेल्यांनाच यातून सूट दिली जाणार आहे़ अगोदरच चतुर्थश्रेणी कर्मचारी अपुरे असताना अशा पद्धतीने कर्तव्यास नकार देणाऱ्यांवर समितीकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे़ अधिष्ठाता डॉ़चंद्रकांत मस्के यांनी या समितीच्या अध्यक्ष डॉ़वैशाली इनामदार असून डॉ़तांबोळी, डॉग़णेश मनूरकर यांची नियुक्ती केली आहे़- डॉ़ राजेश अंबुलगेकर, सल्लागार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड