शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
2
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
3
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
4
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
5
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
6
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
7
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
8
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
9
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
10
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
11
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
12
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
13
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
14
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
15
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
16
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
17
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
19
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
20
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी

coronavirus : धक्कादायक ! नांदेड जिल्ह्यातील १७० कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 19:46 IST

गुरुवारी ११५ रुग्ण आढळले तर १०३ जणांनी केली कोरोनावर मात

ठळक मुद्देजिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ४ हजार ६७० एवढी झाली आहे.कोविड केअर सेंटरमध्ये १६७२ जणांवर उपचार करण्यात येत आहे.

नांदेड : गुरुवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोनाचे आणखी ११५ बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये १६७२ जणांवर उपचार करण्यात येत असून यातील १७० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

गुरुवारी सायंकाळी कोरोना तपासणीचे ७३८ अहवाल प्राप्त झाले. यातील ५७५ अहवाल निगेटिव्ह आले असून ११५ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ४ हजार ६७० एवढी झाली आहे. गुरुवारी आढळलेल्या ११५ बाधितातील ४९ जण स्वॅब नमुना तपासणीद्वारे आढळून आले. तर ७४ जण अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सध्या जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये १६७२ जणांवर उपचार करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक ७९८ जण पंजाब भवन कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर विष्णूपुरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०२ जणांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा रुग्णालयात ४१, नायगाव येथे ३२, बिलोली ३८, मुखेड ३८, देगलूर ४६, लोहा ५३, हदगाव २४, भोकर २१, कंधार १६, धर्माबाद ९९, किनवट ११, अर्धापूर ६, मुदखेड २३, माहूर ६, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय १६, बारड १, उमरी २० तर खाजगी रुग्णालयात ११४ जणांवर उपचार सुरू आहेत.  चार जण उपचारासाठी औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे तर निजामाबाद आणि हैदराबाद येथे प्रत्येकी एक जण संदर्भित आहे.  यातील १७० जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी किल्लारोड येथील एका ५५ वर्षीय पुरुषाचा विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आजवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १६० एवढी झाली आहे.

नांदेड शहरात ३६ बाधित आढळलेगुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार स्वॅब नमुना तपासणीद्वारे ११ तर अ‍ॅन्टीजेन टेस्टद्वारे २५ असे ३६ बाधित नांदेड मनपा क्षेत्रात आढळून आले आहेत. स्वॅब नमुन्याद्वारे अर्धापूर, मुखेड, मुंबई, परभणी, नांदेड ग्रामीण, लोहा, नायगाव आणि यवतमाळ येथील प्रत्येकी एकजण बाधित आढळला.  तर हदगाव, धर्माबाद आणि हिंगोली येथील प्रत्येकी दोघे, किनवट तालुक्यातील तिघे तर बिलोली तालुक्यातील ११ जण बाधित आढळले आहेत. अ‍ॅन्टीजेन तपासणीद्वारे बिलोली, किनवट येथील प्रत्येकी चार, मुदखेड ३, नायगाव ५, नांदेड ग्रामीण, कंधार प्रत्येकी २, धर्माबाद २३ तर देगलूर, यवतमाळ, भोकर, हदगाव येथील प्रत्येकी एक जण बाधित असल्याचे पुढे आले.

गुरुवारपर्यंत २८०३ जणांनी केली कोरोनावर मातकोरोना बाधित रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनावर मात करणा-यांची संख्याही लक्ष्यवेधी आहे. गुरुवारी आणखी १०३ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील १८, आयुर्वेदिक रुग्णालयातील २, बिलोली येथील ११, मुदखेड ११, किनवट ५, भोकर ३, मुखेड ३४, पंजाब भवन कोविड केअर सेंटरमधील ४, उमरी ३ आणि धर्माबाद कोविड केअर सेंटरमधील १२ जणांनी कोरोनावर मात केल्याने या १०३ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजवर जिल्ह्यातील २८०३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड