शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

पंजाबचा ठपका बिनबुडाचा; नांदेडहून गेलेले भाविक पाच राज्यातील प्रवासादरम्यान थांबले होते हॉटस्पॉट क्षेत्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 17:29 IST

नांदेडहून पंजाबला गेलेल्या या भाविकांनी पाच राज्यातून प्रवास केला असून, कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या इंदौर येथेही बराच काळ व्यथीत केल्याचे आता पुढे येत आहे. 

ठळक मुद्दे१४ बस व १२ ट्रॅव्हल्सद्वारे ५७० यात्रेकरू परतलेहॉटस्पॉट इंदोरमध्ये थांबले होते भाविकनांदेडमध्ये लागण झाली म्हणणे चुकीचेच

- विशाल सोनटक्केनांदेड: नांदेड येथे दर्शनासाठी आलेल्या आणि लॉकडाऊनमुळे येथेच अडकून पडलेल्या सुमारे चार हजार भाविकांना केंद्र शासनाच्या पंजाबला पाठविण्यात आले. यातील काही भाविकामुळेच पंजाबमधील कोरोनाबाधितांचा आंकड़ा वाढत असल्याचा ठपका ठेवला जात आहे. मात्र हा दावा बिनबुडाचा तसेच नांदेडची बदनामी करणारा असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नांदेडहून पंजाबला गेलेल्या या भाविकांनी पाच राज्यातून प्रवास केला असून, कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या इंदौर येथेही बराच काळ व्यथीत केल्याचे आता पुढे येत आहे. 

श्री हुजूर साहिब सचखंड गुरु०दाराच्या दर्शनासाठी पंजाब, हरयाणा, राजस्थानसह दिल्ली येथील भाविक नांदेडला आले होते. कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी अचानक लॉकडाऊन केल्याने सुमारे चार हजाराहून अधिक भाविक दिड महिना नांदेडमध्येच अडकून पडले. येथील मुख्य गुरूद्वारा व लंगर साहिब गुरूव्दाराच्या वतीने यात्री निवासमध्ये या सर्व भाविकांची राहण्याची व भोजनाची अत्यंत चांगली व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अडकलेल्या या भाविकांना पंजाबमध्ये विशेष वाहनाने पाठविण्याची आग्रही मागणी होवू लागली. या अनुषंगाने पंजाब आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या सर्व भाविकांना विशेष वाहनाने पंजाबकडे पाठविव्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात लंगर साहिब गुरूव्दाराच्या वतीने १४ बस व १२ ट्रॅव्हल्सद्वारे ५७० यात्रेकरूंना रवाना करण्यात आले. त्यानंतर सचखंड गुरूव्दाराच्या वतीने तेथे थांबलेल्या ३३० यात्रेकरूना द्रुसऱ्या टप्प्यात १० बसव्दारे रवाना करण्यात आले. उर्वरीत सुमारे तीन हजार भाविकांना घेवून जाण्यासाठी पंजाब सरकारने ८० लक्झरी बसेस नांदेडला पाठविल्या होत्या. या गाडयातून २७ एप्रील रोजी सर्व भाविकांना पाठविण्यात आले. याच भाविकांमुळे पंजाबमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचा दावा आता केला जात आहे. मात्र नांदेडकरांनी पंजाबचा हा ठपका फेटाळला आहे. 

या सर्व भाविकांची पंजाबला रवानगी होण्यापूर्वी त्यांची नांदेड येथे आरोग्य तपासणी करण्यात आली होती. याबरोबरच नांदेड महानगरपालिकेच्या पथकाने या सर्व भाविकांना पाठविण्यात येणाऱ्या गाडयाही सॅनिटाईज केल्या होत्या.  नांदेडमध्ये दिड महिना थांबले असताना एकही भाविक पॉजिटिव्ह निघालेला नसताना पंजाबमध्ये जातात हे भाविक पॉजिटिव्ह झाले कसे? मग नांदेडमध्ये त्याचवेळी बाधितांची संख्या का वाढली नाही? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हॉटस्पॉट इंदोरमध्ये थांबले होते भाविकनांदेडहून पंजाबला निघालेल्या या भाविकांनी प्रवासादरम्यान चार ठिकाणी थांबा घेतला. यामध्ये इंदोर ( मध्यप्रदेश) भिलवाडा आणि हनुमानगड (राजस्थान) आणि त्यानंतर भटिंडा (पंजाब) येथे थांबून हे भाविक पंजाबमधील आपापल्या गावी रवाना झाले होते. विशेष म्हणजे प्रवासात सर्वाधिक जास्त वेळ ते मध्यप्रदेशात कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या इंदोर येथे थांबले होते. तेथेच या भाविकांना कोरोनाची बाधा झाली असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे.

पंजाबचे सचिव दर्जाचे अधिकारी होते सोबतनांदेडहून पंजाबला घेवून निघालेल्या वाहनांच्या ताफ्या सोबत पंजाब राज्य शासनाचे सचिव दर्जाचे अधिकारीही सोबत होते. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने घालून दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करुनच भाविकांच्या ताफ्याला नांदेडकरांनी पाठविले होते. हेही स्पष्ट होते.

नांदेडमध्ये लागण झाली म्हणणे चुकीचेचलॉकडाऊनमुळे नांदेडमध्ये अडकलेल्या पंजाबमधील भाविकांची श्री. लंगर साहिब येथे सर्व व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे दिड महिना हे भाविक नांदेडमध्ये होते. या कालावधित त्यांची नियमित आरोग्य तपासणीही करण्यात येत होती. शिवाय पंजाबला पाठवितानाही आरोग्य पथकाने तपासणी केली होती.   त्यामुळे या भाविकांना नांदेडमध्ये कोरोनाची बाधा झाल्याचा आरोप चुकीचा तसेच बिनबुडाचा असल्याची प्रतिक्रिया श्री. लंगर साहिब गुरूव्दाराचे संत बाबा बलविंदरसिंघजी  यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड