शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Nanded : जिल्ह्यात '3- टी' सूत्राचा होणार वापर; मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना तपासणीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 21:24 IST

यंत्रणेवर ताण वाढला : ३- टी त्रिसूत्रीचा करणार वापर

ठळक मुद्देमोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे़

नांदेड : रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे़ अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास अडचण येत आहे़ त्यामुळे ५० वर्षांवरील नागरिक, विदेश किंवा जिल्ह्याबाहेरुन आलेले व ज्यांना प्राथमिक लक्षणे आहेत़ अशा नागरिकांची मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे़ तालुकास्तरावर त्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे़

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या पुढे गेली आहे़ बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांची तपासणी आरोग्य विभागाचे डॉक्टर, आशा वर्कर व एएनएम हे करीत आहेत़ परंतु दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आला आहे़ त्यामुळे कोविड रुग्णांच्या संपर्काततील तसेच ५० वर्षांपेक्षा ज्यांचे वय जास्त आहे़ तसेच विदेशातून, इतर राज्यातून किंवा जिल्ह्यातून प्रवास केला अशा नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे़ 

यामध्ये ट्रेस, टेस्ट अ‍ॅन्ड ट्रीट अशा ३ टी त्रिसूत्रीचा वापर करुन प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न असणार आहे़  मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिट अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे़ ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे़ तसेच ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले़ परंतु प्राथमिकदृष्ट्या कोविड लक्षणे दिसून येत आहेत, अशा नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे़सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहनराजकीय पक्षाचे प्रतिनिधी, विविध संघटना, सामाजिक संस्था यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिकारी यांना सर्वेक्षण करताना सहकार्य करावे़ तसेच जास्तीत जास्त लोकांची तपासणी करण्यासाठी व जिल्हा करोनामुक्त होण्यासाठी पुढाकार घ्यावा़ आपल्या परिसरात कोविडची लक्षणे असलेल्यांची माहिती मिळाल्यास ती लगेच प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड