शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

CoronaVirus : ग्राहकांनी गर्दी केल्याप्रकरणी उमरीत तीन दुकानदारांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 15:59 IST

अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने उघडण्यात आली

उमरी : कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या   आपत्ती व्यवस्थापन  कायद्याचा भंग करून दुकानासमोर   ग्राहकांची गर्दी केल्याप्रकरणी उमरी शहरातील तीन दुकानदारांवर  १८८  चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील अत्यावश्यक किराणा सामान, दुध ,  भाजीपाला ,  अन्य जिवनावश्यक वस्तु व औषधालय  वगळुन बंद ठेवण्याबाबत  सर्व व्यापारी प्रतिष्ठानांना आदेशित करण्यात आले आहे. परंतु उमरी शहरातील कबीरदास सिंगनवाड यांचे श्री साई स्टील सेंटर, देविदास सुर्यवंशी यांचे मदने शुज सेंटर व बाशुमियाँ स्टील सेंटरचा मालक यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघण करुन १७ एप्रिल  रोजी सकाळी ९ ते ११ वाजताच्या दरम्यान आपले  दुकान चालु ठेवुन दुकानावर अनावश्यक गर्दी केली.  तसेच सोशल डिस्टन्सींगचा  भंग केल्याने त्यांच्या विरुध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५  अंतर्गत कलम ५१ ब  व  भा.दं.वि. कलम १८८  अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला .  

उमरी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे.  कोणत्याही प्रकारे नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर अत्यावश्यक काम असल्यास ,कोणीही तोंडावर मास्क न घालता घराहेर पडु नये. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणते आस्थापना , दुकाने उघडून विनाकारण गर्दी केल्याचे निदर्शनास आल्यास वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती   नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे  यांनी  दिली.

सदर कार्यवाहीमध्ये मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली  उपमुख्याधिकारी  अर्जुन गव्हाणे, नगर अभियंता संतोष मुंढे, वरिष्ठ लिपिक सचिन गंगासागरे,  गणेश मदने, माधव जाधव ,   चंद्रकांत श्रीकांबळे,  शंकर माने आदींनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड