शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
3
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
4
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
5
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
6
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
7
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
8
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
9
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
10
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
11
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
12
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
13
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
14
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
15
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
16
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
17
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
18
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
19
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
20
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 

coronavirus : कोरोना संशयित सापडल्याची अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 19:31 IST

फोटोशॉपच्या माध्यमातून तयार केलेली पोस्ट व्हॉट्सअ‍ॅपवर केली व्हायरल

ठळक मुद्दे संशयित चार रुग्ण आढळले होते़ परंतु या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

नांदेड : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाबाबत समाजमाध्यमांवर कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे़ तरीही व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर वृत्तवाहिन्यांच्या लोगोचा वापर करुन अफवा पसरविण्यात येत आहेत़ नांदेडातील सिडको परिसरात मंगळवारी दोन संशयित सापडल्याची अफवा पसरविण्यात आली़ त्याची पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत़ याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संशयित चार रुग्ण आढळले होते़ परंतु या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ आजघडीला शासकीय रुग्णालयात कोरोना संशयित एकही रुग्ण नाही़ त्यामुळे घाबरण्याचे कारण नसले तरी, नागरिकांनी खबरदारी बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे़ तसेच सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे़ दरम्यान, मंगळवारी एका वृत्तवाहिनीच्या लोगोचा वापर करुन फोटोशॉपच्या माध्यमातून सिडकोत दोन संशयित आढळले अशा आशयाच्या ब्रेकींग न्यूजचा फोटो काढून तो व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल करण्यात आला़ त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती़ त्याचप्रमाणे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील गंगाखेड व मानवत येथेही कोरोनाचे रुग्ण आढळल्याची अफवा पसरविण्यात आली़ या प्रकरणात वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ दरम्यान, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत़ 

अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अफवा पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे़ परंतु काही जण खोडसाळपणा करुन कोरोनाचे संशयित असल्याच्या अफवा पसरवित आहेत़ नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये़ अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिला आहे़ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेडPoliceपोलिस