शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

coronavirus : नांदेडमध्ये कोरोनाचा उद्रेक; शनिवारी ९४ बाधित रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 21:11 IST

एकूण रुग्ण संख्या पोहचली ८६९ वर

ठळक मुद्देआतापर्यंत ४४ जणांचा बळी

नांदेड : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन केला़ परंतु त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ आजचा दिवस तर नांदेडसाठी 'शनि' वार ठरला़ आजपर्यंतचे उच्चांकी असे ९४ बाधित रुग्ण आढळून आले़ त्यामुळे नांदेडची रुग्ण संख्या आता ८६९ वर गेली आहे़ तर शहरातील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़

जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालून त्याची साखळी तोडण्यासाठी १३ जुलैपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे़ परंतु लॉकडाऊनच्या काळातही रुग्ण वाढतच आहेत़ प्रशासनाकडून संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत़  शनिवारी तर आजपर्यंतचे सर्वाधिक ९४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत़ त्यामध्ये आसरा नगर १, सांगवी आॅफीस कॉलनी १, मधुबन रेसिडन्सी १, सराफा १, देगलूर नाका २, इतवारा १, रहमतनगर १, जुना कौठा १, जुना मोंढा १, स्रेहनगर १, सोमेश कॉलनी १, गणराज नगर १, पांडूरंग नगर १, सराफा बाजार ३, सिडको १, हैदरबाग २, पिरबुºहाण नगर १, सरपंच नगर २, विष्णूनगर २, आदर्श नगर १, सराफा ४, शिवकृपा कॉलनी १, स्वामी विवेकानंद नगर १, काबरा नगर १, प्रेमनगर २, सरपंचनगर ३, प्रकाश नगर ७, चैतन्यनगर १, नंदनवन कॉलनी ३, गोकुळनगर १, साईनगर १, वजिराबाद १, फरांदे नगर १, विष्णूपुरी १, विसावा नगर १, देगलूर १, उपजिल्हा रुग्णालय देगलूर १, नाथनगर देगलूर १, कंधार १, बामणी ता़मुखेड ६, मुक्रमाबाद ता़मुखेड ४, अशोक नगर मुखेड २, सिद्धार्थ नगर किनवट १, एस़व्ही़एम कॉलनी किनवट १, एकता नगर किनवट १, हिप्परगा ता़नायगांव १, कळमनुरी जि़हिंगोली १, वसमत जि़हिंगोली १, जिंतूर जि़परभणी १, गंगाखेड जि़परभणी १, धुळे १, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर १, परळी जि़बीड १, शक्तीनगर १, सराफा १, मधुबन रेसिडेन्सी ३, विष्णूपुरी ३ आणि वजिराबाद भागात ४ बाधित रुग्णांचा समावेश आहे़ शनिवारी ३५९ जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते़ त्यापैकी २५४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले़ तर शहरातील विष्णूनगर भागातील एका ६७ वर्षीय पुुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला़ त्यामुळे कोरोना बळींची संख्या आता ४४ झाली आहे़ त्यातील ३८ जण हे नांदेड जिल्ह्यातील तर ६ रुग्ण हे शेजारील जिल्ह्यातील होते़ आतापर्यंत प्रशासनाने १ लाख ४८ हजार २०१ नागरीकांचे सर्वेक्षण केले आहे़ तर ९ हजार ८२६ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते़ त्यापैकी ७ हजार ८७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ तर ८६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ अद्याप प्रशासनाला ४०७ जणांच्या अहवालांची प्रतिक्षा आहे़ सध्या विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ९९, पंजाब भवन येथे ९३, नायगांव १२, जिल्हा रुग्णालयात १९, बिलोली १२, मुदखेड ५, मुखेड २९, हदगांव १, देगलूर १८, माहूर १, गोकुंदा २, लोहा २, कंधार २, धर्माबाद ३, शहरातील खाजगी रुग्णालयात ४४, औरंगाबाद येथे संदर्भित ६ तर एका रुग्णाला निजामाबाद येथे पाठविले़ २अँटीजेन चाचणीमध्ये २८ पॉझिटिव्हआरटीपीसीआर प्रणालीद्वारे केलेल्या तपासणीत ६६ बाधित रुग्ण आढळून आले आहेत़ तर नव्याने अँटीजेन चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये २८ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ शनिवारी नायगांव येथील २, डॉ़शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील २, जिल्हा रुग्णालयातील १ अशा सात रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे़ आतापर्यंत ४७६ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे़ तर आजघडीला उपचार घेत असलेल्या ३४९ बाधित रुग्णापैकी १४ महिला आणि १३ पुरुष अशा २७ जणांचे प्रकृती चिंताजनक असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे़ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड