शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : नांदेडकरांना दिलासा; ११५ जणांमध्ये एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 19:57 IST

सोमवारी ११३ जणांचे अहवाल आले निगेटिव्ह

ठळक मुद्दे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२ झालीआतापर्यंत पाच जणांचा झाला मृत्यू

नांदेड :नांदेड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे़ कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती़ त्यात सोमवारी नांदेडकरांना थोडा दिलासा मिळाला आहे़ पाठविलेल्या ११५ स्वॅबपैकी ११३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे़ नांदेडात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२ झाली आहे़

गुरुद्वारा लंगर साहिब येथे एकाच दिवशी २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती़ त्यानंतर दररोज रुग्णांच्या संख्येत वाढच होत गेली़ त्यात आतापर्यंत नांदेड शहरात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे़ रविवारी नव्याने आढळलेल्या सहा रुग्णांमुळे नांदेडने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अर्धशतक गाठले होते़ दिवसेंदिवस रुग्णसंख्येत होणारी वाढ नांदेडकरांची चिंता वाढविणारी आहे़ 

सोमवारी मात्र नांदेडकरांना थोडा दिलासा मिळाला आहे़ प्राप्त झालेल्या ११५ अहवालापैकी ११३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ तर दिल्ली येथील एका ६० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ हा व्यक्ती दिल्ली येथील रहिवाशी असून त्याला एनआरआय यात्रीनिवास येथे ठेवण्यात आले होते़ आतापर्यंत प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे ९८ हजार ६९० जणांची तपासणी करण्यात आली आहे़ १८२८ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी १७०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ तर पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या ५२ एवढी आहे़ पॉझिटिव्ह रुग्णापैकी ११ रुग्णांवर विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, ३३ जणांवर पंजाब भवन येथील कोविड केअर सेंटर तर एका रुग्णावर माहूर येथे उपचार करण्यात येत आहेत़ या सर्वांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ 

किवळा येथील एका चालकाला पंजाबला गेल्याने कोरोनाची लागण झाली होती़ त्याच्या संपर्कातील १९ जणांना क्वारंटाईन केले आहे़ ९ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते़ ते सर्वजण निगेटिव्ह आले आहेत़ अंबानगर सांगवी येथील एक चालकही कोरोनामुळे बाधीत झाला आहे़ त्याच्या संपर्कातील चौघेजण क्वारंटाईन आहेत़ रहेमतनगर येथे कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत़ त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे़ या चौघांच्या संपर्कातील ११२ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ 

गुरुद्वरा लंगर साहिब येथे आतापर्यंत ३५ जण कोरोनामुळे बाधीत झाले आहेत़ त्यांच्या संपर्कातील १४१ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एक महिलाही पॉझिटिव्ह आढळली होती़ तिच्या संपर्कातील ३३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले़ त्याचवेळी आघाडा बाळापूर येथील एक चालकही पॉझिटिव्ह आढळला होता़ त्याच्या संपर्कातील ६ जण क्वारंटाईन आहेत़ नवीन कौठा येथील रवीनगर येथे एक चालक कोरोना बाधीत झाल्यामुळे त्याच्या संपर्कातील ५ जण विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत़ करबलायेथील एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर स्वॅब घेतल्यानंतर तो पॉझिटिव्ह आला़ त्याच्या २७ जण आता क्वारंटाईन केले आहेत़ माहूर तालुक्यातही मालेवाडा येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे़ त्याच्या संपर्कातील १२ जण विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत़

कोरोना रुग्णाच्या संपर्कातील सर्व कोरोन्टाईनजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता ५१ वर पोहोचली आहे़ या सर्व रुग्णांच्या संपर्कातील ५३७ व्यक्तींनाही आरोग्य विभागाने क्वारंटाईन केले आहे़ यात सर्वाधिक श्री लंगर साहिब येथील ३५ रुग्णांच्या संपर्काती १४१ जणांचा समावेश आहे़  जिल्ह्यात २२ एप्रिलपासून आजपर्यंत कोरोना रुग्णांची संख्याही ५१ पर्यंत पोहोचली आहे़ शहरातील पीरबुºहाणनगरातील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता़ त्यांच्या संपर्कातील प्रारंभी ३७ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले़ अन्य ५४ जणही ताब्यात घेण्यात आले होते़ या सर्व ९१ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ त्यानंतर शहरात अबचलनगर येथे दुसरा रुग्ण आढळला़ त्याच्या संपर्कातीलही ३२ जणांना विलगीकरण करताना १८ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते़ त्यात दोघे पॉझिटिव्ह आले आहेत़ ३२ जण क्वारंटाईनमध्येच आहे़ अबचलनगरमधील एका ज्येष्ठाचाही मृत्यू झाला होता़ त्याच्या संपर्कातील ५५ नागरिक क्वारंटाईन करण्यात आले असून, संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड