शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

CoronaVirus : ‘लॉकडाऊन’चा फटका; उत्तर भारतातील २५ हजार नागरिक अडकले रेल्वेच्या नांदेड विभागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 12:45 PM

3 मे पर्यंत कुठलीही प्रवाशी रेल्वे नाही, प्रशासनाचे स्पष्टीकरण

ठळक मुद्देऔरंगाबादमध्ये १० हजारावर प्रवाशीहजारो शीख बांधव अडकले नांदेडमध्ये

- श्रीनिवास भोसलेनांदेड : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला़ या काळात अचानक वाहतूक व्यवस्था बंद करून तालुका, जिल्हा अन् राज्य सीमा सील केल्याने हजारो नागरिक कर्तव्यावर असणा-या ठिकाणी अडकले आहे़. दमरेच्या नांदेड विभागात उत्तर भारतातील २५  हजारावर नागरिक अडकल्याची माहिती समोर येत आहे़

जगावर कोरोना महामारीचे सावट आल्याने सर्वच देशानी कोव्हीड १९ या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विमानसेवा बंद केली़ त्यापाठोपाठ देशातील राज्य  आणि जिल्हा सीमाही सील केल्या़ परिणामी हजारो लोक कर्तव्यावर असणाऱ्या ठिकाणी अथवा उद्योग, व्यवसाय, नोकरी, शिक्षण घेण्यासाठी असलेल्या शहरांमध्ये अडकले आहेत़ देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन असल्याने १४ एप्रिलनंतर परिस्थिती पूर्ववत होईल, अशी आशा होती़ परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी सकाळी पुन्हा देशात ३ मेपर्यंतचा लॉकडाऊन घोषित केला आहे़ त्यामुळे परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रात इतर राज्यातील अडकलेल्या नागरिकांना स्वगृही परतण्यासाठी काही उपाय योजना करण्याची गरज आहे़ त्याअनुषंगाने परप्रांतातील किती प्रवाशी राज्यात अडकले आहेत याचा अंदाज घेतला जात आहे़.

औरंगाबादमध्ये १० हजारावर प्रवाशी

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जवळपास २५ हजारांवर नागरिक अडकले असून त्यात सर्वाधिक उत्तर भारतातील प्रवाशी आहेत. सर्वाधिक औरंगाबादमध्ये जवळपास १० हजार,  नांदेडमध्ये ४ हजार, हिंगोली अडीच हजार, परभणी दिड हजार, जालना दिड ते दोन हजार, वाशिम दोन हजार,  अदिलाबाद भागात ५०० ते ६००, अकोला जिल्ह्यात जवळपास अडीच हजार नागरिक वाढले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे़

परराज्यातील हजारो शिख बांधव नांदेडातचशिखांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्य नांदेडात श्री हुजूर साहिब सचखंड गुरूद्वारा दर्शन घेण्यासाठी  पंजाब, दिल्ली, हरियाणा राज्यातून आलेले जवळपास तीन हजार शिख भाविक नांदेडात अडकले आहेत़ त्यांची लंगर साहिबकडून राहणे, जेवनाची व्यवस्था केली आहे़ परंतु, त्यांना स्वगृही जाण्याची ओढ लागली आहे़ यातील बहुतांश भाविक खासगी वाहने करून निघून गेले़ परंतु, अडीच हजारावर भाविक आजही  गुरूद्वाºयाच्या निवासस्थानात मुक्कामी आहेत़ तर शहरात इतर राज्यातून शिक्षण, व्यवसायानिमित्त आलेल्यांची संख्याही मोठी आहे़

राज्यस्थानमध्ये अडकले विद्यार्थी अन् पालकनीट, जेईई परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्यस्थानमधील कोटा शहरात गेलेले महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी आणि पालक लॉकडाऊनने तिकडेच अडकले आहेत़ परीक्षांच्या तारखा लांबविल्याने सदर विद्यार्थी - पालकांना राज्यात घेवून येण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे़ यामध्ये बहुतांश विद्यार्थी आणि त्यांची आई सोबत राहत आहेत़ त्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे़

रस्त्यांच्या कामावरील मजूराना लागली ओढराज्यभरात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाची आणि रेल्वे दुहेरीकरण करण्याची कामे सुरू आहेत़ या कामांवर राज्यस्थान, बिहार, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातील हजारो मजूर असून ते सध्या कामाच्या ठिकाणीच अडकले आहेत़ लॉकडाऊन किती दिवस राहील आणि परराज्यातील असल्याने नागरिकांचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलत असल्याने भीतीपोटी आपल्या राज्यात जाण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे़

3 मे पर्यंत कुठलीही प्रवाशी रेल्वे नाही, प्रशासनाचे स्पष्टीकरणप्रवासी कामगारांसाठी स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय म्हणून काही विभागांमध्ये रेल्वे सेवांच्या मागणीचे आकलन करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत नियोजनाशी संबंधित संवादाचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, 3 मेपर्यंत कुठल्याही प्रवासी रेल्वे चालविण्याचे नियोजन नसल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेडAurangabadऔरंगाबाद