शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
3
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
4
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
5
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
6
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
7
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
8
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
9
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
10
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
11
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
12
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
13
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
14
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
15
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
16
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
17
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
18
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
19
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
20
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?

'कोव्हिशिल्ड' नावाचा वाद मिटेना; नांदेडच्या कंपनीची सिरमच्या विरोधात पुण्याच्या व्यावसायिक न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 09:51 IST

The controversy over the name 'Covishield' : नांदेड येथील क्‍युटीस कंपनीकडून दावा दाखल

ठळक मुद्दे"कोव्हिशिल्ड' ट्रेडमार्कचा वापर करून मिळवलेला नफा "क्‍युटीस'ला द्यावाकोव्हिशिल्ड' नावाशी मिळते-जुळते नाव "सीरम'ने वापरू नये

नांदेड : कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी येथील "सीरम इन्स्टिट्यूट आफॅ इंडिया' (सिरम) बनवत असलेल्या लशीच्या नावावर नांदेड येथील "क्‍युटीस बायोटीक' या कंपनीने हरकत घेतली होती. त्या अनुषंगाने दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी नांदेड येथील जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याला सिरमकडून न्यायालयाच्या कार्य क्षेत्रावर आक्षेप घेतला होता व हे प्रकरण फक्त व्यावसायिक न्यायालयात चालू शकते असा युक्तिवाद केला होता. अपेक्षेप्रमाणे क्‍युटीस' बायोटेक हा वाद नांदेडच्या व्यावसायिक न्यायालयात घेऊन जाईल असा अंदाज बांधुन सिरमने नांदेडच्या व्यावसायिक न्यायालयात कावेट टाकून ठेवली होती. परंतु,क्‍युटीस बायोटेकने थेट पुण्याचे न्यायालय गाठले. 

"कोव्हिशिल्ड' या ट्रेडमार्कचा वापर करण्यास आम्ही "सीरम'च्या आधी सुरवात केली आहे. त्यामुळे "सिरम'ने लसीची निर्मीती करावी, मात्र तिचे नाव बदलावे, अशी मागणी करणारा दावा कंपनीने येथील जिल्हा न्यायालयात केला आहे."कोव्हिशिल्ड' ला परवानगी देण्यासाठी अर्ज केल्यानंतर "सिरम' "कोव्हिशिल्ड' या ट्रेडमार्कचा वापर करीत असल्याची माहिती "क्‍युटीस'ला मिळाली आहे. आम्ही 29 एप्रिल 2020 रोजी "कोव्हिशिल्ड' हा ट्रेडमार्क मिळण्यासाठी रजिस्टर कार्यालयाकडे अर्ज केला होता. "सिरम'ने त्यानंतर म्हणजे तीन जून 2020 रोजी अर्ज केला आहे. ट्रेडमार्कला अर्ज केल्यानंतर आम्ही कोरोनाशी लढा देण्यासाठी कोविशील्ड नावाने विविध उत्पादने 30 मे पासून बनवायला व त्याची विक्री करण्यास सुरवात केली आहे. हे सर्व उत्पादन "कोव्हिशिल्ड' या ट्रेडमार्कखाली उत्पादित व विक्री केली जात आहेत. मात्र आता "सिरम'ने त्यांची लस "कोव्हिशिल्ड' या नावाने बाजारात आणण्याची तयारी केल्याने ट्रेडर्स आमची उत्पादने घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे कंपनीला आर्थिक फटका बसत आहे. या सर्वांचा विचार करून 'सिरम'ने त्यांच्या लशीचे नाव बदलावे, अशी मागणी या दाव्यात करण्यात आली आहे. ऍड. आदित्य सोनी यांच्यामार्फत "क्‍युटीस'ने ही याचिका दाखल केली आहे.

दोघांचेही अर्ज अद्याप प्रलंबित ः"कोव्हिशिल्ड' हा ट्रेडमार्क मिळण्यासाठी "क्‍युटीस बायोटीक' आणि "सिरम' या दोनही कंपन्यांनी अर्ज केला आहे. मात्र अद्याप कोणत्याही कंपनीला हा ट्रेडमार्क देण्यात आलेला नसून त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. मात्र दरम्यानच्या काळात दोन्ही कंपन्यांनी आपली उत्पादने "कोव्हिशिल्ड' या नावाने उत्पादित करण्यास सुरवात केली आहे.

"सिरम'ने नफा आम्हाला द्यावा ः"कोव्हिशिल्ड' या ट्रेडमार्कचा वापर करण्यास आम्ही आधी सुरवात केली आहे. तसेच त्याबाबतच अर्ज देखील आधी केला आहे. त्यामुळे "सिरम'ने "कोव्हिशिल्ड' या ट्रेडमार्कचा वापर करून लस बाजारात आणली तर त्यातून होणारा नफा "क्‍युटीस'ला द्यावा. कारण तशी तरतूद "ट्रेडमार्क ऍक्‍ट 1999' मध्ये आहे, अशी माहिती "क्‍युटीस'चे वकील सोनी यांनी दिली.

"सिरम'ला न्यायालयाची नोटीस ः"क्‍युटीस'ने दाखल केलेल्या दाव्यानंतर न्यायालयाने "सीरम'ला नोटीस बजावली आहे. तुमच्या विरोधात दावा दाखल झाला आहे. त्यात ट्रेडमार्क वापरण्याबाबत हरकत घेण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत मनाई आदेश का देऊ नये? यावर तुमचे म्हणणे मांडा असे त्या नोटिशीत नमूद आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जानेवारी रोजी होणार आहे.

या आहेत "क्‍युटीस'च्या मागण्या ः- "सिरम'ने लसीचे नाव बदलावे- "कोव्हिशिल्ड' ट्रेडमार्कचा वापर करून मिळवलेला नफा "क्‍युटीस'ला द्यावा- "कोव्हिशिल्ड' नावाशी मिळते-जुळते नाव "सीरम'ने वापरू नये- "सिरम'ने "कोव्हिशिल्ड' ट्रेडमार्क मिळण्याबाबत केलेला अर्ज परत घ्यावा

टॅग्स :NandedनांदेडCorona vaccineकोरोनाची लसPuneपुणे