शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मुस्लिमांना एकटे पाडण्याचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:43 IST

भाजपाने देशात मुस्लिमांना वंचित केले आहे तर काँग्रेस ओबीसींना वंचित करु पाहत आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ठळक मुद्देसत्ता संपादन मेळावा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

नांदेड : भाजपाने देशात मुस्लिमांना वंचित केले आहे तर काँग्रेस ओबीसींना वंचित करु पाहत आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.नांदेडमध्ये गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा शहरातील नवामोंढा मैदानावर घेण्यात आला. यावेळी ‘एमआयएम’चे पक्षप्रमुख असुदोद्दीन ओवेसी यांची प्रमुख उपस्थिती होती.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, ‘आरएसएस’चा देशात छुपा अजेंडा राबविला जात आहे. सांस्कृतिक राष्टवाद या नावाखाली देशाचे विभाजन केले जात आहे. ‘आरएसएस’चा सांस्कृतिक राष्टवाद नेमका काय आहे, हे आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्ट करावे. या विषयावर आपण जाहीर चर्चा करायला तयार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. सांस्कृतिक संघटनेविरुद्ध लढा देण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. २०२२ मध्ये भाजपा संविधानात बदल करुन भारतीय घटनेने दिलेला मताचा अधिकार काढून जातीच्या नावाने कुबड्या उभे करण्याचे काम करत आहे. त्यामुळे आज संविधान वाचविण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.देशात आज मुस्लिमांना भाजपाने वंचित केले आहे. तर ओबीसींना काँग्रेस वंचित करत आहे. आघाडीसाठी ‘एमआयएम’चा मुद्दा पुढे आणला जात असला तरी काँग्रेस खऱ्या अर्थाने ओबीसींना सत्तेपासून दूर ठेवू पाहत आहे. वंचित बहुजन आघाडीने ओबीसींना सत्तेत आणण्यासाठी केलेले प्रयत्न काँग्रेसला नको असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘एमआयएम’चे पक्षप्रमुख खा. ओवेसी यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करताना उत्तर प्रदेशात काँग्रेसला सपा-बसपाने आघाडीत घेतले नाही. त्यामुळे काँग्रेसने तेथे ८० जागा लढविण्याची भूमिका घेतली आहे. ‘एमआयएम’ही राज्यात ४८ जागा लढवू शकली असती. मात्र ‘एमआयएम’ने संविधान वाचविण्यासाठी घेतलेली ही भूमिका खूप मोठी असल्याचे ते म्हणाले.खा. ओवेसी यांनी मुस्लिम समाज काँग्रेसच्या भूलथापांना आणखी किती दिवस बळी पडणार आहे ? असा सवाल केला. भाजपाच्या हिंदू राष्टवादावरही त्यांनी टीका केली. मुस्लिमांना आरक्षण देण्याचा विषय बाजूलाच पडला आहे. पण पुढील काळात ‘वोट हमारा, राज हमारा’ अशी रणनिती राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेवरही ओवेसी यांनी टीका करताना सकाळी भाईभाई, रात्री दुश्मन-दुश्मन तर कधी रात्री भाईभाई, सकाळी दुश्मन-दुश्मन, अशी भूमीका सेनेची असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर सेना सत्तेपासून दूर व्हायचे की नाही हे ठरवेल, असेही ते म्हणाले. ओबीसींनीही आता सेना-भाजपा, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यापासून दूर राहण्याची वेळ आली आहे. राज्यात अनेक घोटाळे झाले. पण अटक केवळ छगन भुजबळ यांना झाली. पवारांचा पुतण्या काय ‘धुतल्या तांदळासारखा होता ?’ असा सवालही ओवेसी यांनी केला.आ. इम्तीयाज जलील यांनी डॉ. बाबासाहेब आंंबेडकरांचे सत्ता संपादनाचे स्वप्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि खा. ओवेसी हे पूर्ण करीत असल्याचे सांगितले. अ‍ॅड. आंबेडकर आणि खा. ओवेसी यांच्याबाबत अनेक चर्चा केली जात आहे. मात्र ते आज एका मंचावर आहेत हे सर्वांनी पहावे, असेही ते म्हणाले.सभेत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फेरोज लाला, रामचंद्र भरांडे, प्रा. यशपाल भिंगे, अ‍ॅड. शिवानंद हैबतपुरे, पक्षाचे महासचिव अमित भुईगळ, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, माजी आ. हरिभाऊ भदे यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक भारिपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संघरत्न कु-हे यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार प्रा. विकास कदम यांनी मानले. मोठ्या संख्येने यावेळी जनसमुदाय उपस्थित होता.

टॅग्स :NandedनांदेडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीcongressकाँग्रेस