शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका

By श्रीनिवास भोसले | Updated: November 9, 2024 16:31 IST

कश्मीरमध्ये तिरंगा नव्हे तर वेगळा झेंडा आणि वेगळा कायदा करून संविधानाचा अपमान काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात केला : पंतप्रधान नरेंद्र मोदी

- श्रीनिवास भोसलेनांदेड : काँग्रेसवाले देशामध्ये डॉ. बाबासाहेबांचे नाही तर त्यांचे स्वतंत्र संविधान चालवायाला पाहत आहेत. तसा प्रयत्न आणीबाणीमध्ये केला होता. आता वेगळे पुस्तक छापून संविधानाची थट्टा उडविण्याचा प्रयत्न काँग्रेसवाले करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. कश्मीरमध्ये तिरंगा नव्हे तर वेगळा झेंडा आणि वेगळा कायदा करून संविधानाचा अपमान काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात केला आहे. त्यांनी ७५ वर्ष दोन संविधान चालविण्याचे काम काँग्रेसवाल्यांनी केले. ३७० ची भिंत उभारण्याचे काम त्यांनी केले. पण, आम्ही सत्तेत आल्यानंतर या कलमाला जमीनीत गाडण्याचे काम केले,असेही मोदी म्हणाले.

नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, मंत्री हेमंत पाटील, खासदार डॅा.अजित गोपछडे, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार डॉ.संतुकराव हंबर्डे, नांदेड उत्तरचे शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर, लोहा येथील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आदींची उपस्थिती होती. 

दिल्लीत मोदी सरकार आले, पण या आनंदात नांदेडचे फुल नव्हते. त्यामुळे आता मी दिल्लीला नांदेडमधून कमळाचे फुल पाठविण्याचे आवाहन करण्यासाठी आलो आहे. तुमच्याकडून मोदीसाठी ही मदत मागत असून त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी महायुतीला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हरियाणाच्या निवडणुकीत पहिल्यापेक्षा जास्त नाही तर इतिहासात सर्वाधिक जागा मिळाल्या. महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार पाहिजे, असेही ते म्हणाले.

मराठवाड्यावर सर्वाधिक अन्याय काँग्रेसवाल्यांनी केला आहे. परंतु, हा भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिमी वैतरनेतून पाणी आणण्याचा निर्णय घेतला गेला आहे. दमनगंगा, वैतरना, गोदावरी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला लाभ होईल. त्यासाठी विविध सिंचन योजनांना मंजूरी दिली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात विविध उद्योग उभारण्यासाठी ८० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे हजारो युवकांच्या हातांना काम मिळले. 

मराठवाडा दुष्काळमुक्त होईलमराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे मुळ काँग्रेस असून त्यांनी येथील शेतकऱ्यांच्या सुखदुखाची कधीच परवा केली नाही. मागील दहा वर्षात भाजप, महायुतीने सिंचनासाठी पुढाकार घेतला. त्यातही अडीच वर्ष बिघाडी सरकारने या योजनांना ब्रेक लावण्याचे काम केले. आज नदी जोड प्रकल्प आणि मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त होईल तर ८० हजार कोटींच्या गुंतवणुकीतून येथे हजारो युवकांच्या हाताला रोजगार मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकnanded-north-acनांदेड उत्तरnanded-south-acनांदेड दक्षिणnanded-pcनांदेडNarendra Modiनरेंद्र मोदी