शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड उत्तरमध्ये काँग्रेस पाठोपाठ उद्धव सेनेचाही उमेदवार; आघाडीसोबत महायुतीलाही टेन्शन

By श्रीनिवास भोसले | Updated: October 29, 2024 15:19 IST

नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदार संघापैकी सर्वात शेवटी नांदेड उत्तर विधानसभेचा उमेदवार काँग्रेसने जाहीर केला.

नांदेड : जिल्ह्यातील नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या महाविकास आघाडीतील गोंधळ अद्याप संपलेला नाही. या ठिकाणी काँग्रेसकडून अब्दूल सत्तार यांना उमेदवारी दिल्यानंतर आता उद्धव सेनेकडून अपक्ष उमेदवार संगीता डक पाटील यांना उद्धव सेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्धव सेना विरूद्ध शिंदे सेना असा सामना हाेण्याची दाट शक्यता आहे. परिणामी शिंदे सेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांचे टेन्शन वाढले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदार संघापैकी सर्वात शेवटी नांदेड उत्तर विधानसभेचा उमेदवार काँग्रेसने जाहीर केला. या मतदार संघात विद्यमान आमदार शिवसेनेचे असून त्यांनी शिंदे सेनेची घरोबा केला आहे. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात रान पेटविले आहे. दरम्यान, सदर जागेवरून वाद निर्माण झाल्याने ही जागा 'मातोश्री'ने काँग्रेसला सोडली आणि त्या बदल्यात हिंगोलीची जागा घेतली. परंतु, नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील निष्ठावंत शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला. तसेच सोशल मिडियावर जाहीररित्या टिकाटिप्पणी केली. तद्नंतर आता उद्धव सेनेने याठिकाणी अपक्ष उमेदवार संगीता डक पाटील यांना एबी फॉर्म दिला असून त्यांनी अधिकृतरित्या आपली उमेदवारी दाखल केली. आता नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेस उमेदवारासह शिंदे सेेनेच्या उमेदवाराचेही टेन्शन वाढले आहे. दरम्यान, आघाडीमध्ये सदर जागा काँग्रेसला दिल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा एबी फाॅर्म डक यांना कसा दिला गेला, याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करू, असे उद्धव सेनेेचे नेते विनायक राऊत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

कहीं खुशी कंही गम...संगीता पाटील डक यांच्या उमेदवारीवरून आता उद्धव सेनेतही दोन गट पडल्याचे पहायला मिळत आहे. जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्या घरी काही शिवसैनिकांनी बैठक घेवून नाराजी व्यक्त केली तर अनेकांनी सोशल मिडियावर उद्धव सेनेने शिंदे सेनेच्या विरोधात उमेदवार दिल्याने स्वागत केले आहे.

लोहा मतदार संघामध्येही आघाडीचे दोन उमेदवारलोहा विधानसभा मतदार संघात देखील आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. या ठिकाणी शेकापकडून विद्यमान आमदार शामसुंदर शिंदे यांना तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून एकनाथ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nanded-north-acनांदेड उत्तरmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकShiv Senaशिवसेना