शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची मनपाकडून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 01:06 IST

जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात समाज परिवर्तनाचे व्यापक काम केले. त्यांनी सामाजिक समतेचा जगाला संदेश दिला. नांदेड शहरात त्यांच्या पुतळा निर्मितीचे अभिवचन काँग्रेसने दिले होते़

नांदेड : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात समाज परिवर्तनाचे व्यापक काम केले. त्यांनी सामाजिक समतेचा जगाला संदेश दिला. नांदेड शहरात त्यांच्या पुतळा निर्मितीचे अभिवचन काँग्रेसने दिले होते़ त्यादृष्टीने महापालिकेच्या पातळीवरील सर्व मान्यतेच्या व जागा उपलब्धतेच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत़ परंतु शासनस्तरावर मान्यता रखडल्यामुळेच पुतळा बसविण्याचे काम प्रलंबित आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी केले.नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर व भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी सभापती माधवराव पांडागळे होते. तर आ. डी. पी. सावंत, महापौर शीलाताई भवरे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, उपमहापौर विनय गिरडे पाटील, शैलजा स्वामी, मेळाव्याचे संयोजक संतोष पांडागळे, संजय बेळगे, बालाजीराव पांडागळे यांच्यासह राजू शेट्टे, दिलीप डांगे, कैलास जाकापुरे, सुभाषअप्पा सराफ, पंडित लंगडे, विनोद कांचनगिरे, हरिहर पाटील कुरुळेकर, रितेश बुरांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.खा.चव्हाण म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांनी समानतेची शिकवण दिली. सामाजिक समतेची बीजे रोवली. संत बसवेश्वरांच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने देशाला गरज आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या विचारश्रेणीवर चालण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. समाजातील सर्व समाजघटकांना सोबत घेवून त्यांना मूलभूत गरजा पुरविल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, असे सांगतानाच कोणत्याही कामात राजकारण करणे योग्य नव्हे़ शहरातील बसेवश्वर पुतळा उभारणीची मनपास्तरावरील प्रक्रिया पूर्ण झाली आहे़ परंतु, शासनस्तरावर मान्यता न मिळाल्याने पुढील काम रखडले आहे. असे असतानासुद्धा काही मंडळी यातही राजकारण करुन याचे खापर काँग्रेस पक्षावर फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही बाब दुर्दैवी आहे. शासनाकडून मान्यता येताच शहरात बसवेश्वरांचा पुतळा बसविण्यात येईल,असे खा.चव्हाण यांनी सांगितले़अध्यक्षीय समारोपात माधवराव पांडागळे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन केले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पांडागळे यांनी केले.

टॅग्स :NandedनांदेडSocialसामाजिक