शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशीही मध्यम पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:58 IST

जिल्ह्यातील गडगा, कौठा, कोळगाव, गुजरी, बोधडी परिसरात सलग दुस-या दिवशी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकरी आनंदले असून, पेरणीच्या कामाला लागले आहेत.

ठळक मुद्देगडगा, कौठा कोळगाव, गुजरी, बोधडी परिसरात पेरण्या सुरु

नांदेड : जिल्ह्यातील गडगा, कौठा, कोळगाव, गुजरी, बोधडी परिसरात सलग दुस-या दिवशी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकरी आनंदले असून, पेरणीच्या कामाला लागले आहेत.गडगा परिसरात ३८ मि.मी. पाऊसगडगा : २९ जूनच्या सकाळी सहा वाजेपर्यंत मांजरमच्या प्रर्जन्यमापकावर ३८ मि.मी. पावसाची नोंद झाली. यंदा पावसाने विलंब केल्याने कापसाचे क्षेत्र कमालीचे घटण्याची शक्यता आहे. सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल आहे. चार-पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतक-यांची चिंता वाढली होती. पाऊस तर नाहीच पण कडक ऊन व प्रचंड उकाडा जाणवत होता, त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या.बोधडी परिसरात पाऊसबोधडी : बोधडी व परिसरात २८ रोजी पाऊस झाल्याने शेतकरी आनंदित झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात शेतकºयांनी धूळपेरणी केली होती़ यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला होता़ २८ रोजी रात्री बोधडी व परिसरात एक ते दीड तास पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी झाला. बोधडी व परिसरात पाऊस झाल्याने शेतकरी बोधडी बाजारपेठेत खते व बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत.मेघगर्जनेसह दमदार पाऊसआरळी : बिलोली तालुक्यातील कोळगाव, गुजरीसह परिसरात २८ रोजी सायंकाळी विजांच्या कडकडाटांसह व मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाला. कोळगाव, गुजरी, कौठा, आरळी, कांगठी, खपराळा, हरनाळा, तोरणा, दुगाव, कुंभारगाव आदी गावांत विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. जवळपास दोन तास पाऊस पडला. या पावसाने शेतकरी आनंदित झाले असून, आता पेरणीस सुरुवात करण्यास शेतकरी आतुर झाला.खोळंबलेल्या पेरण्या सुरुकौठा : जून महिन्याच्या शेवटी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकºयांत आनंद पसरला आहे़ पेरणीयोग्य पाऊस झाल्याने रखडलेली पेरणी जोरदार सुरु झाली असून कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी पेरणीकडे शेतकरी वळला आहे़ शनिवारी सकाळपासून काही शेतकरी कापूस लागवडीच्या घाईगडबडीत दिसत होते़ कृषी सेवा केंद्रावर बियाणे खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती़ सकाळपासून आभाळ दाटून आल्याने शेतकरी दिवस निघताच पेरणीसाठी धावाधाव करत होते़ दुपारी दोन वाजताच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पेरणी थांबवावी लागली़ शनिवार आठवडी बाजारात मात्र शुकशुकाट दिसून आला़

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊस