शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर; आईसह दोन चिमुकल्यांचा ओढ्याच्या पुरात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:45 IST

हदगाव तालुक्यातील वरवट गावातील घटना

हदगाव: वरवट गावात शेतातून परत येणाऱ्या दोन चिमुकल्या आणि त्यांची आई ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना दुपारी घडली. ग्रामस्थानी शोध घेतला असता दोन मुलीचा मृतदेह आढळला असून आईचा शोध सुरू आहे. 

मागील तीन चार दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मात्र, सकाळपासून उघडिप दिल्याने शेतकरी पेरणीपूर्वीची कामे करण्यासाठी शेतात गेले होते. दरम्यान, दुपारी १२ वाजता ढगफुटी सदृश्य पावसाला सुरूवात झाली. एक ते दिड तास सतत पाऊस कोसळला. यामुळे वरवट गावालगत असलेल्या ओढ्याला अचानक पुर आला. दरम्यान, अरुणा बळवंत शकीरगे (३५) या दुर्गा बळवंत शकीरगे(८) व समीक्षा विजय शकीरगे(७) या चिमुकल्यासोबत शेतातून घराकडे निघाल्या. मात्र, पुराचा अंदाज न आल्याने तिघी ओढ्यात वाहून गेल्या. 

माहिती मिळताच ग्रामस्थांनी ओढ्यात तिघीचा शोध सुरू केला. काहीवेळाने दुर्गा, समीक्षा आणि अरुणा शकीरगे यांचा मृतदेह आढळला. ही घटना समजताच तहसीलदार सुरेखा नांदे, तलाठी, मंडळ अधिकारी आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली असून शोध कार्य सुरू आहे.

टॅग्स :Nandedनांदेडfloodपूर