शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; शेतीचे अतोनात नुकसान, अनेक नागरिक अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 12:25 IST

नांदेड जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्याने नांदेड-परभणी वाहतूक ठप्प झाली आहे.

नांदेड: अगोदरच पाण्याअभावी दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांना पून्हा तिबार पेरणीचे संकट उभं ठाकलय. शेतकऱ्याची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. पुराच्या पाण्यामुळे पिकासह शेतीही खरडून गेलीय..अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरलं आहे. तर तालुक्यातील शेलगाव खु., शेलगाव बु.,शेणी, कोंढा, देळूब खु.देळूब बु. सह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे पासदगाव मार्गे परभणीकडे जाणारी वाहतूक बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्याने नांदेड-परभणी वाहतूक ठप्प झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने आसना नदीला पूर आला. अर्धापूर तालुक्यातील मेंढला नाल्यालाही पूर आलाय. पासदगाव जवळील आसना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आलीये . नांदेड कडून परभणी आणि हिंगोलिकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नांदेडात सखल भागात कमरे इतकं पाणी; नागरिक अडकले, आपत्ती व्यवस्थापन गायब मुसळधार पावसामूळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. नांदेड शहरातील श्रावस्तीनगर , सादतनगर , तेहरा नगर , नोबेल कॉलनी या भागात कमरे इतक पाणी साचलं आहे . या भागात अनेक नागरिक अडकून पडले आहेत . घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून नुकसान झाले . अजूनही पाऊस सुरू असल्याने पाणी वाढतच आहे . पाणी साचल्याने अनेकजण घर सोडून सुरक्षित स्थळी निघून गेले .या भागात पावसामुळे हाहाकार माजला असतांना महापालिकेची यंत्रणा किंवा आपत्ती व्यवस्थापन इथे पोहचले नाही . पावसाळ्यापूर्वी पालिकेने नाले सफाई केल्याचा दावा केला होता . पण चार तासाच्या पावसासोबत पालिकेचा दावा देखील वाहुन गेला . कारण श्रावस्तीनगर भागातील नाल्यातील पाणी या भागात साचले आहे.

दरम्यान, उमरी - नांदेड हायवे रस्त्यावरील गोरठा शिवारातील  रेल्वेच्या  भुयारी  पूलाखाली  पावसाचे पाणी साचल्याने या  रस्त्यावरील  वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे.

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेड