शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

नांदेड शहरात जूनमध्ये मुख्य रस्ते खोदले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:30 AM

शहरात जून महिन्याच्या मध्यात मुख्य रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे. हे रस्ते महावितरणकडून खोदले जात असून महापालिकेने ७ जून रोजी हे काम थांबविण्याचे आदेश दिले असतानाही त्याकडे महावितरणने कानाडोळाच केला आहे.

नांदेड : शहरात जून महिन्याच्या मध्यात मुख्य रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे. हे रस्ते महावितरणकडून खोदले जात असून महापालिकेने ७ जून रोजी हे काम थांबविण्याचे आदेश दिले असतानाही त्याकडे महावितरणने कानाडोळाच केला आहे. पाऊस लांबल्याचा असाही फायदा शहरात घेतला जात आहे. पाऊस पडल्यानंतर काय? असा प्रश्न शहरवासीय उपस्थित करीत आहेत.भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम महावितरण करीत आहे. महापालिकेने यासाठी परवानगीही दिली होती. मात्र आता जूनच्या २० तारखेपर्यंत शहरातील प्रमुख रस्ते खोदण्याचे काम सुरूच होते. पावसाळा लांबला असल्याने या खड्यांचे परिणाम शहरवासियांना दिसत नसले तरीही एखाद्या पावसानेही संपूर्ण शहराची त्रेधा तिरपीट उडणार आहे.जवळपास ३ ते ४ फूट रुंद आणि ४ फूट खोल असे खोदकाम केले जात आहे. त्याचवेळी वीज वाहिन्या टाकल्यानंतर रस्ते दुरुस्तीचे कामही केले जात नाही.याबाबत महापालिकेचे कार्यकारी अभियंता गिरीश कदम यांच्याशी संपर्क साधला असता महापालिकेने ७ जून रोजीच हे काम थांबवण्याचे आदेश दिले. मात्र प्रत्यक्षात आजही काम सुरुच आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर शहरवासीयांना होणाऱ्या त्रासास जबाबदार कोण? असा प्रश्न पुढे येत आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा