शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

कंधार तालुक्यात अधिग्रहणावर नागरिकांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:37 IST

तालुक्यातील वाडी, तांड्यावर पाणीटंचाईचे तांडव निर्माण झाले असून ४० गावे, वाडी व तांड्यांतील तहान अधिग्रहण केलेल्या विहीर, विंधन विहिरीवर भागत आहे़ सध्या ६ टँकरने ५ तांडे, १ वाडी व एका गावाची तहान भागत असून शिराढोण तांडा, महादेवमाळ तांडा, गोविंद तांडा, गांधीनगर टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्दे ४० गावांसह वाड्या-तांड्यांवर ६७ अधिग्रहणे

कंधार : तालुक्यातील वाडी, तांड्यावर पाणीटंचाईचे तांडव निर्माण झाले असून ४० गावे, वाडी व तांड्यांतील तहान अधिग्रहण केलेल्या विहीर, विंधन विहिरीवर भागत आहे़ सध्या ६ टँकरने ५ तांडे, १ वाडी व एका गावाची तहान भागत असून शिराढोण तांडा, महादेवमाळ तांडा, गोविंद तांडा, गांधीनगर टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.तालुक्यात गतवर्षी सरासरी पर्जन्यवृष्टी झाली नाही. झालेला पाऊस अल्प व दीर्घ अंतराने झाला. त्यामुळे जलसाठे भरलेच नसल्याने टंचाईत भर पडली. त्यामुळे दुष्काळाने कहर केला आहे. टंचाई निवारण्यासाठी केलेल्या उपाययोजनाची अंमलबजावणी करताना प्रशासनाची व तसेच टँकर, अधिग्रहण आदींचे प्रस्ताव तयार करून दाखल करण्यासाठी कसरत होत असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील ४० गावे, वाडी, तांडयाची तहान ६७ बोअर व विहीर अधिग्रहणावर भागत आहे. त्यात सर्वाधिक अधिग्रहण संख्या कुरूळा ६ आहे. आंबुलगा ५, आलेगाव १, उमरगा खो. १, कंधारेवाडी २, कौठा १, खंडगाव ह. १, गुंडा बिंडा दिंडा १, गोणार १, घोडज ३, चिखलभोसी १, जाकापूर २, तळयाचीवाडी १, दाताळा २, दिग्रस खु.२, पानशेवडी १, बामणी प.क.१, बोरी खु.१, भुत्याचीवाडी १, भेंडेवाडी १, मंगलसांगवी ३, मसलगा २, मादाळी १, मानसिंगवाडी २, मुंडेवाडी १, लाठ खु.२, वहाद १, वहादतांडा १, शिरसी बु.१, शिरूर १, संगुचीवाडी २, सावरगाव १, सावळेश्वर १, हाटक्याळ ३, हाडोळी ब्र.१, हणमंतवाडी १, हारबळ प.कं.१, हाळदा ३, हासूळ ३, हिप्परगा शहा १ अधिग्रहण संख्या आहे.दरम्यान, याबाबत विचारले असता उपलब्ध जलसाठे मोठ्या प्रमाणात उपसले जात होते. मानार नदी, बारूळ प्रकल्प, जगतुंग समुद्र या जागी विद्युत पुरवठा चालू असताना वारेमाप उपसा केला जात होता. परंतु विद्युत वितरण, महसूल यंत्रणेकडून एकत्रित कार्यवाही केली. जगतुंग समुद्रातील १८ विद्युत मोटारी काढण्यात आल्या असून मानार प्रकल्पातील मोटारीही काढण्याची कार्यवाही केल्याची माहिती तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी ‘लोकमत’ला दिली.विशेष दुरुस्तीची कामे संथगतीनेपाणीटंचाई दूर करण्यासाठी केलेल्या प्रस्तावित आराखड्यात तात्पुरती पूरक नळयोजना, नळयोजना विशेष दुरूस्ती उपाययोजना ३६ मंजूर झाल्या. ऐन टंचाई काळात कामे पूर्ण होऊन नागरिकांना पाणी मिळेल. याचा भरवसा राहत नाही. अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया, प्रत्यक्ष कामे करणे आणि पाणीपुरवठा सुरू करणे मोठे आव्हान ठरले. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कामाची मंजुरी व निविदा प्रक्रिया लांबली असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई