शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीआयडीचे पथक नांदेडात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : कृष्णूर येथील मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत गेलेल्या शासकीय धान्य घोटाळ्याचा तपास काही दिवसांपूर्वीच सहाय्यक ...

ठळक मुद्देकृष्णूर धान्य घोटाळादिवसभर केली कागदपत्रांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कृष्णूर येथील मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत गेलेल्या शासकीय धान्य घोटाळ्याचा तपास काही दिवसांपूर्वीच सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडून काढून तो सीआयडीकडे सोपविण्यात आला होता़ त्यानंतर बुधवारी सीआयडीचे पथक नांदेडात या प्रकरणाच्या चौकशीसाठी दाखल झाले होते़ दिवसभर पथकाने स्थानिक गुन्हे शाखेत या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली़खुपसरवाडी येथील शासकीय धान्य गोदामातून दहा ट्रक धान्य कृष्णूर येथील मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत गेल्याचे पोलिसांच्या धाडीवरुन उघडकीस आले होते़ या धाडीनंतर पोलिसांनी दहा ट्रक धान्य जप्त करीत कंपनीला सील ठोकले होते़तसेच या प्रकरणात कंपनीचे संचालक, व्यवस्थापक, धान्य वाहतूक ठेकेदार यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ तब्बल दोन महिने धान्याचे हे ट्रक पोलिसांच्याच ताब्यात होते़ त्यामुळे त्याला कोंबही फुटले होते़ त्यात कंपनीच्या गोदामात धान्याची नेमकी पोती किती? यावरुनही बराच गोंधळ उडाला होता़ गोदामात गव्हाची कमी अन् भुश्श्याची अधिक पोती आढळली होती़ त्यानंतर पोलीस आणि महसूल प्रशासनामध्ये ‘अहवालयुद्ध’ रंगले होते़पोलीस कारवाईचे समर्थन करीत होते तर महसूल मात्र पोलिसांची कारवाई चुकीची असल्याचा दावा करीत होते़ या दरम्यान, वाहतूक ठेकेदार पारसेवार आणि व्यवस्थापक तापडिया यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला़ त्यात काही दिवसांपूर्वीच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ त्याअनुषंगाने बुधवारी सीआयडीचे पथक नांदेडात दाखल झाले होते़या पथकाने दिवसभर स्थानिक गुन्हे शाखेत पोलिसांनी जप्त केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली़ तसेच महसूल प्रशासनाशीही संपर्क साधला़ या पथकाकडून हा तपास पूर्ण करण्यात येणार आहे़ तर दुसरीकडे कंपनीने या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे़

टॅग्स :NandedनांदेडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस