शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चिटफंडची चिटिंग कोट्यवधीची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:51 IST

चिटफंडमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट लाभ देण्याचे आमिष दाखवित संतकृपा मार्केटमधील मुंदडा चिटफंडने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे़ फसवणुकीचा हा आकडा सध्या लाखात असला तरी, तो लवकरच कोट्यवधीत जाण्याची शक्यता आहे़ ३० हप्त्यांच्या भिशीत गुंतवणूकदारांनी जवळपास २६ हप्ते भरले आहेत़ परंतु, चिटफंडच्या या कार्यालयाला आता टाळे असल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़

ठळक मुद्दे१७ लाखांचा गंडा : तक्रारींचा आकडा वाढण्याची शक्यता

नांदेड : चिटफंडमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट लाभ देण्याचे आमिष दाखवित संतकृपा मार्केटमधील मुंदडा चिटफंडने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे़ फसवणुकीचा हा आकडा सध्या लाखात असला तरी, तो लवकरच कोट्यवधीत जाण्याची शक्यता आहे़ ३० हप्त्यांच्या भिशीत गुंतवणूकदारांनी जवळपास २६ हप्ते भरले आहेत़ परंतु, चिटफंडच्या या कार्यालयाला आता टाळे असल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़शहरात खाजगी भिशी अनेकजण चालवितात़ गटागटाने भिशीचे हे उद्योग सुरु असून यामध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणे सर्वात महत्त्वाचे असते़ संतकृपा मार्केटमधील मुंदडा चिटफंडने नेमके हेच हेरुन अगोदर गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी गुंतवणूकदारांना भिशीचे पैसे दामदुपटीने परत दिले़ चिटफंड ही कंपनी नोंदणीकृत असून यामध्ये गुंतवणूकदारांच्या एक पैशालाही धक्का लागणार नाही, याची खात्री पटवून देण्यात आली़ मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीसाठी अल्पावधीत गुंतविलेल्या रकम दामदुप्पटीने परत दिली जाईल, असे आमिष दाखविण्यात आले़ त्यामुळे शासकीय नोकरदारांपासून ते व्यापाऱ्यांसह अनेकांनी यामध्ये पैसे गुंतविले़ ३० हप्त्यांच्या या भिशीत जवळपास २६ हप्त्यापर्यंत रक्कम गुंतवणूकदारांनी भरली होती़ ही रक्कम लाखाच्या घरात आहे़ २६ हप्ते झाल्यानंतर रजिस्ट्रार कार्यालयात नोंद करावयाची आहे असे सांगून गुंतवणूकदारांकडील सर्व डाय-या ताब्यात घेण्यात आल्या़ त्यानंतर कार्यालयाला टाळे ठोकून मुंदडा कंपनीने पळ काढला़ या विरोधात गुंतवणूकदारांनी मुंदडाच्या विरोधात पोलिसांकडे धाव घेतली़ परंतु गुन्हा नोंद करण्यात आला नाही़ शेवटी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले़न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंदडा चिटफंडच्या संचालकाविरोधात गुन्हे नोंदविण्याचे आदेश पोलिसांना दिले़ या प्रकरणात आतापर्यंत एकूण सात गुन्हे दाखल झाले आहेत़ या सात जणांनी जवळपास १७ लाख रुपये चिटफंडमध्ये गुंतविले होते़ येत्या काळात फसवणुकीचा आकडा कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता आहे़

टॅग्स :NandedनांदेडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस