शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नांदेड लोकसभेसाठी भाजपाकडून चिखलीकर, खतगावकर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:19 IST

काँग्रेसकडून नेमके कोण निवडणूक रिंगणात उतरते, त्यावरच भाजपाचा उमेदवारही ठरणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक पक्षश्रेष्ठींनी काढायला सांगितली ना हरकत प्रमाणपत्रे

विशाल सोनटक्के

नांदेड : लोकसभेसाठी काँग्रेसने आ. अमिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली आहे. दुसरीकडे ऐनवेळी खा. अशोकराव चव्हाण हेही लोकसभेच्या मैदानात उतरु शकतात. काँग्रेसकडून नेमके कोण निवडणूक रिंगणात उतरते, त्यावरच भाजपाचा उमेदवारही ठरणार आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा पक्षश्रेष्ठी आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह जि. प. सदस्या मीनल खतगावकर यांच्या नावाचाही विचार करत असून पक्षाने या दोघांनाही नाहरकत प्रमाणपत्रे काढून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नांदेड मतदारसंघात जिल्हा काँग्रेसकडून आ. अमिता चव्हाण यांच्या उमेदवारीबाबतचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, खा. अशोकराव चव्हाण हेही ऐनवेळी लोकसभेच्या रिंगणात उतरु शकतात. तसे संकेतही अशोकराव चव्हाण यांनी यापूर्वीच दिले आहेत. आ.अमिता चव्हाण यांचे नाव पुढे आल्यानंतरही भाजपाकडून उमेदवारीवर केवळ चर्चाच सुरु आहे. आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह संतुक हंबर्डे, आ. राम पाटील रातोळीकर, धनाजीराव देशमुख आदींनी उमेदवारीसाठी फिल्डींग लावलेली असतानाच आता भाजपा पक्षश्रेष्ठींनीही डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे.

काँग्रेसप्रमाणेच भाजपानेही लोकसभा उमेदवारीसाठी फार्म्युला तयार केला आहे. अशोकराव चव्हाण लोकसभेच्या मैदानात उतरल्यास आ. प्रताप पाटील चिखलीकर तर आ. अमिता चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यास त्यांच्याविरोधात मीनल खतगावकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. मीनल खतगावकर यांचे नाव यानिमित्ताने प्रथमच खासदारकीसाठी पुढे आले आहे. त्यामुळे काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच भाजपाकडूनही लगेच उमेदवाराची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ ला मिळालेल्या माहितीनुसार भाजपा पक्षश्रेष्ठींनी आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह मीनल खतगावकर यांनाही उमेदवारी अर्जासाठी आवश्यक असणारी नाहरकत (नोड्यूज) प्रमाणपत्रे काढून घेण्याच्या सूचना दिल्या असून या दोन्हीही पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार नाहरकत प्रमाणपत्रे काढण्यास सुरुवातही केली आहे.

दरम्यान, या घडामोडीबाबत आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण विधानसभेसाठीच इच्छुक आहोत. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यास त्यांच्या आदेशानुसार कार्यवाही करु, असे त्यांनी स्पष्ट केले. नाहरकत प्रमाणपत्राबाबत विचारले असता होय, सर्व प्रकारची नाहरकत प्रमाणपत्रे काढली असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसभा उमेदवारीवरुन भाजपात खल सुरु असून उमेदवाराची अंतिम निवड करण्यापूर्वी अनेक अंगाने पक्षश्रेष्ठी विचार करत आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील विधानसभा उमेदवारीसंदर्भातही चर्चा होत आहे. नांदेड जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ असल्याने काँग्रेसबरोबरच भाजपा पक्षश्रेष्ठींनीही जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. सद्य:स्थितीत भाजपाकडे जिल्ह्यातील एकमेव मुखेड मतदारसंघ आहे. या मतदारसंघाबरोबरच नायगाव मतदारसंघ भाजपाला हवा आहे. तर युतीतील शिवसेना नायगाव सोडल्यास किनवट मतदारसंघासाठी आग्रही असल्याचे कळते. या संदर्भातही मुंबईमध्ये होत असलेल्या बैठकांत चर्चा झडत आहेत. 

भाजपाच्या बैठकांवर बैठकालोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय वर्तुळातील घडामोडींनी वेग घेतला आहे. काँग्रेसकडून अशोकराव चव्हाण अथवा आ. अमिता चव्हाण यांच्यापैकीच एक उमेदवार निवडणूक लढणार असल्याने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. या बाबतीत भाजपामध्ये चर्चेवर चर्चा सुरु आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघटनमंत्री विजय पुराणिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असून अखेरच्या क्षणी नांदेड लोकसभेसाठी ते कोणाला मैदानात उतरवितात, याकडे भाजपा कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.

टॅग्स :NandedनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा